न्यूझीलंडविरुद्ध टिम इंडियाचा पराभव, पाक खेळाडूंचा जल्लोष

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसिम अक्रमचा डान्स व्हायरल

    01-Nov-2021
Total Views |

pakistan_1  H x
मुंबई : आयसीसी टी - २० चषक स्पर्धेत भारताला न्यूझीलंडविरुद्ध हार पत्करावी लागली. यामुळे आता भारताचे स्पर्धेतील अस्तित्व धोक्यात आले आहे. असे असताना पाकिस्तानला मात्र याचा चांगलाच आनंद झाल्याचे दिसत आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार वकार युनुस टीम इंडियाच्या पराभवानंतर चांगलाच नाचताना दिसला. तर सवयीप्रमाणे शाहीद आफ्रिदीने टीम इंडियाच्या पराभवानंतर जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले.
 
 
 
 
 
सोशल मिडियावर एक व्हिडियो व्हायरल झालेला दिसत आहे. यामध्ये पाकिस्तानचे माजी कर्णधार वसीम अक्रम, वकार युनुस, मिसबाह उल हक आणि वहाब रियाज जोरदार नाचताना दिसत आहेत. पाकिस्तान स्पोर्ट्स चॅनेलच्या स्टुडिओमध्ये बसून हे लोक गाण्यावर थिरकत आहेत. यावरून भारतीयांनी मात्र चांगलीच टीका केली आहे. माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूंना हे असे शोभत नाही, अशी टीका भारतीय क्रिकेट प्रेमींनी केली आहे.
 
 
 
 
 
दुसरीकडे सवयीप्रमाणे भारतावर नेहमी टीका करणारा शहीद आफ्रिदीनेदेखील जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. त्याने ट्विट केले आहे की, "टीम इंडियाकडे अजूनही उपांत्य फेरीत पोहोचण्याची एक संधी आहे. पण पहिल्या दोन मोठ्या सामन्यांमध्ये ज्या प्रकारे खेळ केला आहे, त्यांना उपांत्य फेरीत पाहणं हे एखाद्या चमत्कारासारखे असेल." असे म्हंटले आहे. तर तिकडे पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरनेदेखील भारताच्या पराभवावर निराशा व्यक्त केली.
 
 
 
 
 
"नाणेफेक हरल्याबरोबरच टीम इंडियाचा पराभव निश्चित झाला होता. टीम इंडियाने खूप वाईट क्रिकेट खेळले. संघ अजिबात लयीत दिसत नव्हता. खेळाडू खूप दडपणाखाली असल्याचे दिसत होते. दोन संघ मैदानात आहेत, याची मला कल्पना नव्हती. एकच संघ खेळतो आहे असे वाटत होते." असे अख्तरने म्हंटले आहे. भारतीय संघ पहिल्या दोन सामने गमावल्यानंतर उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. दुसरीकडे पाकिस्तानने तिन्ही साखळी सामने जिंकून जवळपास उपांत्य फेरीचे तिकीट पक्के केले आहे.