आरोपीच्या पिंजर्‍यात चीन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Oct-2021   
Total Views |

News _1  H x W:



कोरोनाचे मूळ गाव चीनच आहे, असा दावा वारंवार यापूर्वी करण्यात आला. मात्र, डाव्या माध्यमांनी पूरेपूर चीनला वाचवण्याचा प्रयत्न केला. चीनचा विरोध करणार्‍यांचाही बंदोबस्त लावण्याचा प्रयत्न झाला, असाच एक आरोप आता पुन्हा एकदा लावण्यात येत आहे. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेच्या एका कंपनीने चीनला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे.



 
झालं असं की, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेच्या ‘जॉईंट सायबर सिक्युरिटी फर्म’ने कोरोना आणि चीनच्या संबंधांचा दावा केला आहे. चीनने कोरोना महामारीचा पहिला रुग्ण आढळण्यापूर्वी एक महिना आधीच कोरोना टेस्टिंग किट्स खरेदी केल्या होत्या. तिथल्या एका प्रांतात याची खरेदी केल्याचे संशोधन त्यांनी जाहीर केले आहे.
 


 
‘सिक्युरीटी फर्म इंटरनेट २.०’द्वारे दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या हुबेई प्रांतात २०१९ मध्ये ‘पीसीआर’च्या ‘टेस्ट किट्स’ची मागणी वाढली होती. २०१९ मध्ये हुबेई प्रांतात ‘आरटीपीसीआर’ चाचणीसाठी १०.५ दशलक्ष डॉलर्स खर्च करण्यात आले होते. २०१८च्या तुलनेत हे दुप्पट होते. कोरोना चाचणी करण्यासाठी विविध पर्याय पुढे आले. मात्र, ज्या ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा अहवाल हा अचूक मानला जातो.
 
 
सर्वात जास्त चाचण्या हुबेईतील वुहान शहरातील करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे, कोरोनाचा पहिला रुग्णही इथेच आढळला होता, म्हणजेच कोरोना रुग्ण आढळण्यापूर्वी ‘आरटीपीसीआर’ टेस्ट किट्सची खरेदी करून ठेवण्यात आली होती, असा दावा या कंपनीने केला आहे. ३१ डिसेंबर, २०१९ रोजी चीनने जागतिक आरोग्य संघटनेला याबद्दल माहिती कळविली होती. म्हणे एका नव्या प्रकारच्या न्यूमोनियाच्या विषाणूचा रुग्ण आढळला आहे. मात्र, ७ जानेवारी रोजी चीनने ‘कोविड सार्स-२’, असा तो विषाणू असल्याची घोषणा केली होती. कोरोना हा प्रयोगशाळांतील चुकांमुळे पसरला, ही बाब यापूर्वीच उघड झाली होती.
 
 
 
मात्र, चीनच्या दबावतंत्राने ही माहितीही दाबून टाकण्यात आली. चिनी प्रयोगशाळांच्या या बेफिकिरीबद्दल ‘कोरोना विषाणू मानवनिर्मितच?’, ही आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांची लेखमाला दै. ‘मुंबई तरुण भारत’मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. यात अगदी तर्कसंगत चीनचा खोटारडेपणा उघडा पाडण्यात आला होता. या नव्या संशोधनांमुळे इतकेच घडते की, चीन वारंवार कोरोनाच्या मुद्द्यावर उघडा पडत आहे. कोरोना विषाणूबद्दलचे सर्वच योगायोग आणि पाळेमुळे वुहानच्या प्रयोगशाळेभोवतीच का फिरतात, हे कोडे अजून सुटलेले नाही.
 
 
कारण, चीनने या प्रयोगशाळेच्या तपासणीसाठी दिलेला नकार हा संशय बळावणारा ठरतो. काही वैज्ञानिकांच्या मते, जिथे कोरोना विषाणूवर चाचण्या केल्या जात होत्या. तिथे जैवसुरक्षितता पाळली नसल्याचा फटका संपूर्ण जगाला बसल्याचा दावा संशोधक करतात. ज्या मार्केटमध्ये कोरोना आढळला, तिथून काहीच अंतरावर ही प्रयोगशाळा आहे. जिथे अशा जीवघेण्या विषाणूंवर चीनमध्ये प्रयोग सुरू होते. या प्रकोपाला जितकी जबाबदार चिनी प्रयोगशाळा आहे, तितकेच तिथले सरकारही आहेच. कारण, चीनला अशा विषाणूवर अभ्यास करायचा होता की, जो आजार अस्तित्वातच नाही.
 
 
मात्र, हा आजार अस्तित्वात आला तर त्यावर लस ही सर्वांत आधी आपण बनवू आणि वैद्यकीय क्षेत्रात अधिराज्य गाजवू, असा त्यांचा या प्रयोगामागचा मनसुबा होता. मात्र, ‘बायोसेफ्टी लेव्हल ४’ प्रकाराची सुरक्षा गरजेची असताना मात्र, त्यातही हलगर्जीपणा झाला. या प्रकारामुळे तिथल्या कर्मचार्‍यांना कोरोना संक्रमण झाले. त्यांनी स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेतले. त्यातही कोरोनामृत्यू झाले. सुरुवातीला वटवाघळांमुळे कोरोना पसरतो, असा दावा करण्यात आला. मात्र, वटवाघळे ही ५० किमीपेक्षा दूर परिघात जाऊ शकत नाहीत. मात्र, तरीही या भागात कोरोना झपाट्याने पसरला.
 
 
त्यावेळी चूक लक्षात येऊनही विमानतळे, सार्वजनिक वाहतुकीची साधने तातडीने बंद करण्यात आलेली नाहीत. तिथल्या अनेक संसर्गबाधितांनी दूरदेशात प्रवास केला आणि हा प्रसार इतर देशात झाला. आपल्या लक्षात येईल, सुरुवातीला विमानतळ किंवा तत्सम ठिकाणांहून आलेल्यांना कोरोना संक्रमण झाल्याच्या बातम्या होत्या. कोरोनाबाधित चीनहून आलेल्याच्याही बातम्या होत्या. मात्र, दुसरीकडे हा विषाणू नैसर्गिकरीत्या उत्पत्ती झाल्याचाही दावा केला जातो. भविष्यातही यावर संशोधन होईल. परंतु, कोरोनाचे मूळ चीनच, हे तरी कुणी नाकारू शकत नाही.






@@AUTHORINFO_V1@@