नवी दिल्ली : अलाहाबाद उच्च न्यायालयाने प्रयागराजमधील चंद्रशेखर पार्कमधील सर्व अतिक्रमणे हटवण्याचे निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, चंद्रशेखर आझाद पार्कमध्ये बांधलेली मशीद आणि कबरही हटविण्यास सांगितली आहेत. या प्रकरणी याचिका या वर्षी २३ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आली होती.
मुख्य न्यायमूर्ती मुनीश्वरनाथ भंडारी आणि न्यायमूर्ती पीयूष अग्रवाल यांच्या विभागीय खंडपीठाने सांगितले की, '१९७५नंतर उद्यानातील सर्व बेकायदा अतिक्रमणे पाडली पाहिजेत. तसेच, याबाबत अधिकाऱ्यांनी ८ ऑक्टोबरपर्यंत त्याचे अनुपालन अहवाल सादर करावा." यावेळी न्यायालयाने म्हंटले आहे की, "आम्हाला वाटत की हा पार्क कुठल्याही परिस्थितीमध्ये अतिक्रमण मुक्त व्हावा." जितेंद्र सिंग या व्यक्तीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती की मुस्लिम समाजातील काही लोक कृत्रिम कबरे बनवून संपूर्ण उद्यानाचे स्मशानात रूपांतर करत आहेत.