हिंदूंना ज्ञान दिले, तसे ‘सिएट टायर्स’ने मुस्लिमांनाही रस्ते नमाज-दर्गे-मशिदी-आंदोलनासाठी नाहीत, रस्ते ट्रॅफिकसाठी आहेत, हे सांगणारी जाहिरात करावी. पण, मुस्लिमांना रस्त्यांचा उपयोग नेमका कोणत्या कामासाठी करावा, हे सांगण्याची हिंमत आमिर खान वा ‘सिएट टायर्स’ दाखवणार नाहीत, कारण तसे काही केले तर दगडफेकीची, जाळपोळीची भीती.
महाशिवरात्रीला शिवशंकराच्या पिंडीवर दूध अर्पण न करण्याचे, होळी-रंगपंचमीला पाणी वाचवण्याचे, कन्यादानला ‘कन्यामान’ म्हणण्याचे आवाहन करणार्या बॉलिवूड कलाकार, जाहिरातकर्ते आणि वस्तू उत्पादकांनी आता दिवाळीला फटाके न उडवण्याचे ज्ञान दिले आहे. हर्ष गोयंकांच्या नेतृत्वातील ‘आरपीजी ग्रुप’च्या मालकीच्या ‘सिएट टायर्स’ने दिवाळीच्या पृष्ठभूमीवर नुकत्याच बॉलिवूड अभिनेता आमिर खान अभिनित दोन जाहिराती प्रदर्शित केल्या. दोन्ही जाहिरातीतून हिंदू सणांना आणि हिंदू संस्कारांना लक्ष्य करण्यात आले असून, त्यावरूनच समाजमाध्यमांतून हर्ष गोयंका, आमिर खान आणि ‘सिएट टायर्स’च्या दुटप्पीपणाचा जोरदार विरोध करण्यात येत आहे.
कारण, या जाहिराती फक्त हिंदूंना रस्त्यावर कसे वागावे, कसे वागू नये, याचे ज्ञान देत आहेत. पण, त्याचवेळी मुस्लिमांच्या रस्त्यावरील नमाज, जुम्मा वगैरेंचा साधा उल्लेखही करत नाहीत. ‘सिएट टायर्स’ने १९ सप्टेंबरला पहिली जाहिरात प्रदर्शित केली. या जाहिरातीत आमिर खान एका क्रिकेट संघाचा समर्थक असून, “आमचा संघ जिंकल्यास, अनार, सुतळी बॉम्ब, भुईचक्र उडवू. पण, कुठे? सोसायटीच्या आत, रस्ते फटाके उडवण्यासाठी नाहीत, ट्रॅफिकसाठी आहेत,” असे म्हणतो. त्यानंतर पाठीमागून आवाज येतो, “एक दिवस आपण समजूतदार होऊ; पण तोपर्यंत...” त्यानंतर लगेचच एक चारचाकी गाडी रस्त्यात अडकून पडल्याचे व लोक फटाके उडवत असल्याचे दृश्य दाखवले आहे.
तर २६ सप्टेंबरला ‘सिएट टायर्स’ने दुसरी जाहिरात प्रदर्शित केली त्यात आमिर खान एका हिंदू विवाह समारंभात सहभागी झाल्याचे दाखवले आहे. इथे तो म्हणतो की, “फटाके उडवायचे ते फुटपाथवर, रस्ते यासाठी नाहीत, रस्ते ट्रॅफिकसाठी आहेत.” वरील दोन्ही जाहिरातींतून त्यातील कलाकार, जाहिरातकर्ते आणि वस्तू उत्पादकांची धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली तयार झालेली मुस्लिमांचे लाड नि हिंदूंना लक्ष्य करण्याची मानसिकता स्पष्टपणे दिसतेे व त्यामुळेच समाजमाध्यमातून ञ्च्बॉयकॉटमहिंदूफोबिकमसिएट यासारखी मोहीम सुरू झाली.
‘सिएट टायर्स’च्या पहिल्या जाहिरातीतून अगदी थेट शब्दांत हिंदू समजूतदार नाहीत, असे ठसवण्यात आले आहे. मात्र, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडात प्रत्येक वेळी फक्त देशातील हिंदूंनीच समजूतदारपणा दाखवलेला आहे. अन्य समाजापैकी मुस्लिमांनी मात्र नेहमीच आपण समजूतदार नाहीत आडमुठेच आहोत, असे दाखवून दिले. देशाची फाळणी त्यांच्या आडमुठेपणाचा सर्वात घातक परिणाम, त्यानंतरही त्यांचा आडमुठेपणा संपलेला नाही. पण, त्यांच्या समजूतदार नसण्यावर या जाहिरातीत किंवा अन्य कोणत्याही जाहिरातीत कधीही एका शब्दाने उल्लेख नसतो. याच जाहिरातीत फटाक्यांमुळे गाडी अडकल्याचे दाखवले आहे, म्हणजे दिवाळीतील ट्रॅफिक जॅमला जबाबदार हिंदू व त्यांचे फटाके उडवणेच असल्याचे यातून ‘सिएट टायर्स’, आमिर खान आणि हर्ष गोयंकांना सिद्ध करायचे आहे.
इथे हर्ष गोयंकांच्या हिंदूंनाच लक्ष्य करण्याच्या मानसिकतेचाही परिचय द्यायला हवा. यंदाच्या वर्षी ११ मार्चला महाशिवरात्री होती व त्याच दिवशी हर्ष गोयंकांनी आपल्या ट्विटर खात्यावरून शिवशंकराचा अतिशय वाह्यात शब्दांत अपमान केला होता. “शिवशंकर पृथ्वीवर येतात, बारमध्ये जातात, व्हिस्कीच्या पाच बाटल्यांनंतर ते रमच्या पाच बाटल्या पितात, तरीही शांत असलेल्या शिवशंकराला पाहून बारटेंडरला धक्का बसतो व तो विचारतो, कोण तू, अजूनही दारू प्यायला नाहीस? त्यावर आम्ही प्रत्यक्ष भगवंत आहोत, असे शिवशंकर म्हणतात आणि ते ऐकून “आता चढली याला,” असे बारटेंडर म्हणतो,” अशा प्रसंगाचे ट्विट हर्ष गोयंकांनी केले होते.
तर यंदाच्याच १४ एप्रिलला हर्ष गोयंकांनी आपल्या ट्विटर खात्यावरून, एवढासा मास्क पाहून आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे घाबरल्याचे म्हणत कुंभमेळ्यातील लंगोटधारी हिंदू साधूंवर टीका केली होती. हे ट्विट्स फक्त वानगीदाखल, याव्यतिरिक्तही हिंदूंवर टीका करणारे अनेक ट्विट्स त्यांच्या ट्विटर खात्यावर आहेत. त्यांच्याच ‘सिएट टायर्स’ने आमिर खानला घेऊन दिवाळीत रस्त्यावर फटाके न वाजवण्याचे ज्ञान देणार्या जाहिराती प्रदर्शित केल्या. अशा जाहिरातींना हर्ष गोयंकांचेही प्रोत्साहन असणारच, हे त्यांच्या आतापर्यंतच्या कृतीवरून स्पष्ट होते.
दरम्यान, दिवाळी वा विवाहावेळी रस्त्यावर फटाके उडवू नयेत, ते ट्रॅफिकसाठी आहेत, असा संदेश आमिर खान, हर्ष गोयंका व ‘सिएट टायर्स’ने दिला, त्याला विरोध असण्याचे कारण नाही. विरोध फक्त निवडून निवडून हिंदूंनाच लक्ष्य करण्याला आहे. कारण, आज देशातील, राज्यातील, शहरांतील, गावांतील कितीतरी रस्त्यांवर हिंदूंमुळे नव्हे, तर मुस्लिमांमुळेच ट्रॅफिक जॅम होते. कारण काय, तर प्रचंड वेगाने लोकसंख्या वाढल्याने मुस्लिमांना नमाज, जुम्मासाठी मशिदी पुर्या पडत नाहीत म्हणून ते रस्त्यावर येऊन नमाज पढतात. तसेच अनेक रस्त्यांवर, मधोमध चौकात मुस्लिमांच्या पीर-फकिरांचे दर्गे वा मशिदीही उभ्या असतात. म्हणजे, एका बाजूला मशिदींच्या भोंग्यातल्या आरडाओरड्याचा अन्य धर्मीयांना त्रास होतोच, त्याच्या जोडीला नमाज-दर्गे-मशिदींसाठी जागा अडवल्याने रस्ते, चौकात ट्रॅफिक जॅमचा जाचही इतरांना सहन करावा लागतो.
असाच प्रकार तब्बल सहा महिन्यांपर्यंत दिल्लीतील शाहीनबागेत रस्ता अडवून ‘सीएए’विरोधात आंदोलन करणार्या अम्मीजान, खालाजानमुळेही घडला होता. पण, आज हिंदूंना रस्ते फटाक्यांसाठी नाही, तर ट्रॅफिकसाठी असण्याचे ज्ञान देणारे आमिर खानसारखे लोक रस्ते नमाज-दर्गे-मशिदींसाठी नाहीत, रस्ते ‘सीएए’विरोधी आंदोलनासाठी नाहीत, असे मुस्लिमांना सुनावताना दिसत नाहीत. आमिर खानने खरे तर यासाठी पुढाकार घ्यायला हवा, हिंदूंना ज्ञान दिले तसे ‘सिएट टायर्स’ने मुस्लिमांनाही रस्त्यावर नमाज पढू नका, दर्गे-मशिदी बांधू नका, आंदोलन करू नका, कारण रस्ते ट्रॅफिकसाठी असतात, हे सांगणारी जाहिरात करावी, अशी कल्पना हर्ष गोयंकांसमोर मांडावी.
पण, मुस्लिमांना रस्त्यांचा उपयोग नेमका कोणत्या कामासाठी करावा, हे सांगण्याची हिंमत आमिर खान वा ‘सिएट टायर्स’ दाखवणार नाहीत, कारण तसे काही केले तर दगडफेकीची, जाळपोळीची भीती. त्यांचा हाच दुटप्पीपणा समाजमाध्यमांतून अनेक जागरूक हिंदू आणि सर्वसामान्य नागरिक दाखवून देत आहेत, बहिष्काराचे आवाहन करत आहेत. ते बरोबरच, कारण आर्थिक फटका बसला तरच आमिर खान वा ‘सिएट टायर्स’सारख्या सदा न कदा हिंदूंनाच लक्ष्य करणार्या मानसिकतेच्या लोकांना अद्दल घडेल, अक्कल येईल आणि ते हिंदूंचा विरोध करणार नाहीत.