मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने मुंबई-गोवा क्रुझवर रविवारी कारवाई केली आणि ड्रग्स प्रकरणात तब्बल १४ जणांना ताब्यात घेतले आहे. हे प्रकरण तेव्हा प्रकाशझोतात आले, जेव्हा बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे याचेदेखील नाव यामध्ये समोर आले. रविवारी दिवसभर त्याची चौकशी केल्यानंतर झगमगत्या विश्वाचे एक काळे वास्तव सर्वांसमोर आले. आर्यन खान हा गेली ४ वर्षे ड्रग्स घेत असून केवळ भारतातच नाही तर परदेशातही त्याने ड्रग्जचे सेवन केले आहे. यामध्ये युके, दुबई या देशांचा त्याने उल्लेख केला आहे. आर्यन खानसोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमे यांचादेखील अटक केलेल्या व्यक्तींमध्ये समावेश आहे.
बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची आत्महत्या आणि बॉलीवूड ड्रग्स कनेक्शन यानंतर एनसीबीची गेले अनेक महिने धडक कारवाई चालू आहे. रविवारी एनसीबीने केलेल्या एका क्रुझवर केलेल्या कारवाईत आर्यन खानसह ८ जणांना अटक केली. यापैकी ३ जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ड्रग्सप्रकरणी अटकेत असलेल्या मुलगा आर्यन खान याच्यासहित दोघांना पुन्हा वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन जाण्यात आले आहे. नंतर त्यांना किल्ला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीच्या चौकशी दरम्यान कायदेशीर प्रक्रियेचा एक भाग म्हणून २ शाहरुख आणि आर्यनचे २ मिनिटांसाठी बोलणे झाले. यावेळी चौकशीदरम्यान सतत रडत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, तो गेली ४ वर्षांपासून ड्रग्सच्या आहारी असल्याची माहिती त्याने स्वतःहून एनसीबीच्या अधिकाऱ्यांना दिली. केवळ भारतातच नव्हे तर युके, दुबई आणि इतर काही देशांमध्ये आर्यानाने ड्रग्सचे सेवन करत असल्याचेदेखील त्याने सांगितले. शाहरुख आणि गौरीला आपल्या मुलाच्या सगळ्या सवयीची पूर्वीपासूनच माहिती होती. तसेच, आर्यन आणि अरबाज हे १५ वर्षांपासून मित्र आहेत. अद्याप अधिकृतरित्या याबाबत कोणतीही माहिती समोर आली नसून या प्रकरणामुळे आणखी काय माहिती समोर येते हे येत्या काळात स्पष्ट होईलच.