पुणेकरांना दिलासा
शहरात कोरोनाने एकही मृत्यु नाही
31-Oct-2021
Total Views |
पुणे: पुणे शहराने कोरोना महामारीच्या दोनही लाटा यशस्वी पणे थोपवल्या. पुणे शहरात एकेकाळी रोज २००० पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण सापडायचे. मात्र शहराला आता कोरोना पासून दिलासा मिळायला लागला आहे अस म्हणावयास हरकत नाही.पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या ट्वीट नुसार पुणे शहरात आजच्या दिवशीही कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यु झालेला नाही. गेल्या ११ दिवसात कोरोनाने मृत्यु न होण्याचा हा ७ वा दिवस आहे. पुणे शहरातील कोरोना स्थितीची माहिती देताना महापौर मोहोळ यांनी '' पुणे महापालिका हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांचे दगावण्याचे प्रमाण आणखी घटले असून आजही कोरोनाबाधित मृत्यूसंख्येची नोंद नाही. रुग्णसंख्या घटत असताना मृत्यू संख्याही कमी होणे, हा मोठा दिलासा पुणेकरांना सामूहिक प्रयत्नांनी मिळत आहे असे ट्वीट केले.