उद्धव ठाकरेंच्या बंगल्यांची माहिती कुणी दिली ?सोमय्या यांचा सवाल

वादग्रस्त क्लिप व्हायरल प्रकरणी बोलताना भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केला सवाल

    03-Oct-2021
Total Views |


uddhav 3_1  H x

ठाणे : वादग्रस्त क्लिप व्हायरल प्रकरणी बोलताना भाजप नेते किरिट सोमय्या यांनी सवाल केला मग, मुख्यंमंत्री उद्धव ठाकरेंच्या १९ बंगल्यांची माहिती कुणी दिली ? हे देखील विचारणार का ? .तसेच,ठाकरे सरकार आपले फोन टॅप करीत असल्याचे या व्हायरल क्लिपमुळे सिद्ध झाल्याचेही ते म्हणाले.रविवारी ठाण्यातील केबीपी महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सोमय्या बोलत होते.मविआ आघाडीतील शिवसेनेचे हेवीवेट मंत्री अनिल परब यांच्या घोटाळ्यांची माहिती शिवसेनेचेच माजी मंत्री रामदास कदम यांनी प्रसाद कर्वे यांच्यामार्फत किरिट सोमय्या यांच्यापर्यत पोहचवल्याच्या कथित ऑडिओ क्लिप समोर आल्या.त्यानंतर शिवसेनेत घरचा भेदी कोण असा सवाल केला जात असतानाच घोटाळ्यांपेक्षा या क्लिपमागे कोण आहे ?

याचीच चर्चा राजकारणात रंगली आहे.या पार्श्वभूमीवर किरिट सोमय्या यांना छेडले असता,मला कोण माहिती देतात ते महत्वाचे नाही,घोटाळ्यांची माहिती खरी आहे.आता ठाकरे सरकारमध्ये इंटर मॅटर सुरू आहे.कधी सुनील तटकरे गीते वर बोलतात,गीते सुनील तटकरेवर बोलतात.आता एक नवा वाद सुरू झाला आहे.अनिल परब आणि रामदास कदम बाबत कोण कोणाला माहिती देत आहे.मला एकच गोष्ट सांगायची आहे,घोटाळ्याची माहिती कोण देतो यापेक्षा त्या माहितीतुन घोटाळा उघड होत असेल तर त्या संबंधात ठाकरे सरकार ढिलाई का करत आहे ? जी माहिती मिळते ती एकही माहिती चुकीची नाही ..असा दावा सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला..

सध्या एकच विचारले जात आहे की, तुम्हाला रामदास कदम ने माहिती दिली की प्रसाद कर्वेशी तुम्ही बोललात ? विविध माहिती मला मिळत आहे.मग तुम्ही विचारणार का,उद्धव ठाकरे यांच्या १९ बंगल्याची माहिती कोणी दिली ? असा सवाल करून सोमय्या यांनी,या क्लिप प्रकरणामुळे ठाकरे सरकारकडुन माझे फोन टॅप करीत असल्याचे उघड झाले आहे. असा जाहिर आरोप केला.