मुंबई : बॉलीवूड अभिनेता विकी कौशल याचा 'सरदार उधम सिंह' हा चित्रपट १६ ऑक्टोबर रोजी ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित झाला. यानंतर सर्वत्र या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी 'मंडेला', 'नयत', 'शेरनी' सारख्या बड्या चित्रपटांसोबत 'सरदार उधम सिंह'देखील ऑस्करच्या शर्यतीत होता. मात्र, आता चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर काढल्याचे साग्न्यात आले आहे.
विशेष म्हणजे, या चित्रपटात ब्रिटिशांबद्दल द्वेष दाखवलेला आहे असे कारण देत परीक्षकांनी हा चित्रपट ऑस्कर नामांकनातून वगळण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे आता भारतीयांकडून नाराजी व्यक्त होत असून असे करणे म्हणजे भारतीयांचा अपमान असल्यची भावना व्यक्त करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे चित्रपटाचे परिक्षण करणाऱ्या समितीने मल्याळम भाषेतील 'कूळांगल' या चित्रपटाची निवड केली आहे.
यावेळी परीक्षण समितीचे सदस्य इंद्रदीप दासगुप्ता यांनी सांगितले की, "सरदार उधम सिंह हा एक उत्तम चित्रपट आहे. सिनेमॅट्रोग्राफीदेखील कमाल आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील दर्जेदार सिनेमा आहे. पण सिनेमात जालियनवाला हत्याकांड दाखवण्यात आला आहे. तसेच हा चित्रपट इंग्रजांविरुद्ध भाष्य करणारा आहे." परंतु, या निर्णयाचा भारतीय प्रेक्षकांनी विरोध केला आहे. 'जगातील सर्वोच्च पुरस्कार' म्हणून ऑस्कर पुरस्काराकडे पाहिले जाते. मात्र, तरीही 'सरदार उधम सिंह' सारखा चित्रपट फक्त ब्रिटीशद्वेषासाठी नाकारणे हे घृणास्पद आहे.