सेव्हन हिल्स हॉस्पिटलचा पूर्ण क्षमतेने वापर करा

अभिजित सामंत यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

    27-Oct-2021
Total Views |
bmc_1  H x W: 0 
 
मुंबई,दि. २६ (प्रतिनिधी) : "कोविड काळामध्ये मरोळ, अंधेरी विभागातील सेव्हन हिल्स हॉस्पिटलचा मुंबई महानगरपालिकेने पूर्ण क्षमतेने वापर करून विशेष करून उपनगरातील कोविडग्रस्त नागरिकांना अतिशय उत्तम आरोग्य सुविधा देऊन अनेकांचे प्राण वाचविले. तसेच पहिल्या टप्प्यातील कोविड लसीकरणादरम्यान दर दिवशी किमान हजार नागरिकांचे लसीकरण केले त्याबद्दल सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन करतो," असे भाजप नागरसेवकक अभिजित सामंत यांनी म्हटले आहे.
 
 
 
अभिजित सामंत म्हणाले, "माझ्या माहितीनुसार जानेवारी 2021 ते मार्च 2021 पर्यंत ज्यावेळी कोविडचा प्रभाव ओसरू लागला होता त्यावेळी सेव्हन हिल्स हॉस्पिटल येथे किमान 200 बेड्स हे कोविड व्यतिरिक्त उपचाराकरिता वापरण्यात आले होते आणि त्या दरम्यान हृदयविकार, किडणी, मेंदू विषयक अशा जटील आजारांच्या रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया केल्या गेल्या होत्या. परंतु मार्च 2021 नंतर कोंविडने पुन्हा एकदा उचल खाल्ल्यामुळे कोविड व्यतिरिक्त उपचारांच्या सुविधा बंद करण्यात आल्या. सध्या ऑक्टोबर 2021 मध्ये आपण मुंबईमध्ये कोविडवर बरीचशी मात केली आहे आणि कोविड रुग्णांचे प्रमाण अत्यल्प होत चालले आहे. त्यामुळे ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन माझी आपणांस विनंती आहे की, सेव्हन हिल्स हॉस्पिटल मध्ये उपलब्ध असलेल्या आरोग्य विषयक सोयी सुविधांचा वापर करून हृदय विकार, कॅन्सर, किडणी, मेंद, डायबेटीज, थायरोईड इ. गंभीर आजारांवर उपचार करण्याकरिता मुंबईतील विशेष करून पश्चिम उपनगरातील गरीब नागरिकांना ही उच्च प्रतीची आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी." अशी मागणी सामंत यांनी केली आहे.