मौलाना संविधानापेक्षा मोठे आहेत का? : क्रांती रेडकर

समीर वानखेडे मुस्लीम असलाच दावा हा मौलानाकडून करण्यात आला

    27-Oct-2021
Total Views | 157

Kranti Redkar_1 &nbs
मुंबई : गेले काही दिवस एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. आतातर समीर वानखेडे यांच्या धर्मावरून मोठे वादळ उठले आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ते मुस्लीम असल्याचा दावा केला आहे. तसेच, २७ तारखेला सकाळी समीर वानखेडेंचा पहिला निकाह लावणारे काझी मुजम्मिल अहमद यांनीदेखील हाच दावा केला आहे. यावर आता त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांनीदेखील 'मौलाना संविधानापेक्षा मोठे आहेत का?' असा प्रश्न विचारला आहे.
 
 
अभिनेत्री क्रांती रेडकर म्हणते की, "समीर वानखेंडेंनी अशा कोणत्याही कागदपत्रांवर सही केली नव्हती. ज्यामुळे त्यांचा धर्म बदलेल. ते तेव्हाही हिंदू होते आणि आजही हिंदू आहेत. त्यांची जात ही जात प्रमाणपत्राप्रमाणे महार आहे. ज्याचे पुरावे समीर यांच्या वडिलांनी सर्वांसमोर आणले आहेत." त्यानंतर पुढे म्हणते की, "ते मौलाना भारतीय संविधानापेक्षा मोठे आहेत का? संविधानातर्फे जे प्रमाणपत्र मिळाले, हा भारत फक्त त्यालाच मानतो. त्यामध्ये ते हिंदू आहेत असे लिहिले आहे. नवाब मलिक जर कायदेशीर लढाई लढायला गेले तरी ते हिंदूच आहेत."
 
 
पुढे नवाब मलिकांवर टीका करताना तिने म्हंटले की, "मंत्री नवाब मलिक खूप खालच्या पातळीवर गेलेत आहेत. त्यांना राजीनामा द्यावाच लागेल. आरोप करताना लाज वाटली पाहिजे. हिंदू महार असल्याचं प्रमाणपत्र सासऱ्यांनी सगळ्यांना दाखवलं आहे. नवाब मलिकांनी जे आरोप केलेत ते न्यायालयात सिद्ध करावे. जितक्या खालच्या दर्जाला जात आहे त्याने असंच वाटतं मंत्रिपदाची काही देणंघेणं नाही."
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121