मुंबई, दि. २६ (प्रतिनिधी) : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. मंगळवार, दि.२६ ऑकटोबर रोजी महापालिकेतर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार शहरात २९३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ३२९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ७३१३९४ आहे. मुंबईचा सध्याचा रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे.
मंगळवारी मुंबईत पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या शहरात ४,१०१ सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर १३६८ दिवसांवर गेला आहे. मुंबईत सध्या ४३ इमारती सील करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत एकही कंटेनमेंट झोन नाही, अशी माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे