मुंबई : भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश यांच्या विद्यमाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्व संपन्न कारकीर्दीवर आधारीत "कर्मयोगी नमो!"या लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशचे संयोजक ॲड. शैलेश गोजमगुंडे यांनी दिली आहे.
भाजपच्या "सेवा आणि समर्पण" अभियानांतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त "कर्मयोगी नमो!" ही लघुपट स्पर्धा नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीवर आधारीत असेल. एक मिनिट ते बारा मिनिटांच्या लघुपटासाठी भाषेचे बंधन नाही. या स्पर्धेसाठी प्रथम रु.७५ हजार,द्वितीय रु.५१ हजार तृतीय रु. ३१ हजार तर पाच उत्तेजनार्थ प्रत्येकी रु.१५ हजार, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्कारांचे स्वरुप आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी २५ डिसेंबर रोजी पुरस्कार वितरण होईल, अशी माहिती प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक ॲड. शैलेश गोजमगुंडे यांनी वार्ताहर परिषदेत स्पष्ट केले.
"कर्मयोगी नमो!" लघुपट स्पर्धा विनाशुल्क असून अधिक माहितीसाठी
[email protected] या इमेलवर तसंच स्पर्धा आयोजक संचित यादव ९८७०४६७८६० या क्रमांकावर,तर मुंबई प्रदेश संयोजक मकरंद पाध्ये यांच्याशी ९९२०५६४२७८ व्हाट्स ॲपवर संपर्क साधावा, असं आवाहन भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठनं केलं आहे.