पुण्यातील मध्यवर्ती भागात अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती

भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

    25-Oct-2021
Total Views |

श्रीराम मंदिर प्रतिकृती _
 
 
 
 
पुणे: २०१७ च्या निवडणुकीत पुणे महानगरपालिका भाजपने राष्ट्रवादीच्या हातून खेचून आणली; तेव्हा पासून पुणे भाजप मध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जगातील हिंदूचे प्रेरणास्थान असणाऱ्या अयोध्येतील श्री.राम मंदिराचे भूमिपूजन देशाचे माननीय. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट २०२० रोजी झाले.
 
 
पुणे शहरात पण अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती असावी असे अनेकांचे मत होते. पुण्यातील मध्यवर्ती भागातील 'एरंडवणे' येथे पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक आणि पुणे भाजपचे सरचिटणीस दीपक पोटे यांनी अयोध्येतील श्री.राम मंदिराची 'डिजिटल प्रतिकृती' राजा मंत्री उद्यान येथे महापालिका विकास निधीतून उभी केली आहे. या प्रतिकृती मुळे शहरातील नागरिकांना अयोध्येतील राम मंदिराचा लढा समजायला मदत होणार आहे.
 
या डिजिटल प्रतिकृतीची लोकार्पण भाजप प्रदेश अध्यक्ष व कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक धीरज घाटे ,विश्वहिंदू परिषदेचे तुषार कुलकर्णी, नगरसेवक जयंत भावे, नगरसेविका माधुरीताई सहस्त्रबुद्धे, नगरसेविका मंजुश्रीताई खर्डेकर, पुणे शहराचे सरचिटणीस दत्ताभाऊ खाडे, कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष पुनीत जोशी, रा.स्व.संघाचे धनंजय काळे, झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्ष विशाल पवार, प्रशांत हरसुले, मितालीताई सावळेकर, युवा मोर्चाचे सरचिटणीस प्रतीक देसरडा, अभिजीत राऊत, दीपक पवार, सुनील मिश्रा व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.