सगळेच जलील...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Oct-2021   
Total Views |


mim 2_1  H x W:

रकार तुमचे आहे, हिंमत असेल तर औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करून दाखवा,” असे आव्हान देणारे ‘एमआयएम’चे इम्तियाज जलील. आता ज्याच्या नावावरून औरंगाबाद नाव पडले, तो औरंगजेब या इम्तियाज जलीलांचा कोण नातेवाईक (बाप आहे का? असेच म्हणायचे आहे.) आहे का? असा प्रश्न पडू शकतो. औरंगजेबाबद्दल इतके प्रेम जलील यांना का वाटते? संभाजी महाराजांच्या नावाला जलीलचा आणि त्यांच्या ‘एमआयएम’ पक्षाचा विरोध का?



अनन्वित क्रूर अत्याचार सहन करूनही धर्मवीर संभाजी महाराजांनी औरंगजेबासारख्या नीच, कपटी धर्मांध व्यक्तीसमोर गुडघे टेकले नाहीत. संभाजी महाराजांनी मृत्यू पत्करला. पण, धर्म सोडला नाही. या परिक्षेपात इम्तियाज जलील यांनी त्यांच्या पूर्वजांच्या वंशावळी पाहाव्यात. त्यांचे पूर्वज कोण होते? त्यांच्या पूर्वजांना मुस्लीम होताना काय सहन करावे लागले असेल? याचा एकदा तरी विचार इम्तियाज जलील यांनी केला तर पुन्हा म्हणून कधी ते औरंगजेबाच्या आठवणीचे गोडवे गाणार नाही. असो. जलील यांचे आव्हान महाविकास आघाडीने स्वीकारायलाच हवे. कारण, महाराष्ट्र औरंगजेब आणि त्याच्या समर्थकांचा नाही, तर महाराष्ट्राचे कुलदैवतच छत्रपती शिवाजी महाराज आहेत. महाराष्ट्रात जर औरंगजेबाचेच नाव घेऊन एखादे शहर अस्तित्वात असले, तर हा महाराष्ट्राच्या इतिहासाला लागलेला कलंकच आहे.




राज्यात शिवसेना सत्तेत आहे. जन्मापासून या पक्षाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने समाजकारण आणि सत्ताकारणही केले. आज वेळ आली आहे की, या महाविकास आघाडीने त्यातही शिवसेनेने जलीलसारख्या औरंगजेबप्रेम्यांना महाराष्ट्राची खरी संस्कृती दाखवावी. महाराष्ट्रात औरंगजेब नव्हे, तर धर्मवीर संभाजी महाराजच आदर्श आहेत हे दाखवावे. अर्थात, वडापाव पुढे ‘शिव’ लावणारे आणि महाशिवविकास आघाडीतून ‘शिव’ हा शब्दही काढणारे सत्तापिपासू नेते जलीलसमोर गप्प बसतील, संभाजीनगर-औरंगाबाद अशी दोन्ही नावे एकत्र वापरण्याचा वेळकाढूपणाही करतील. जलील यांचा ठोसपणे निषेधही त्यांनी केला नाही. जलील आणि त्यांचे आव्हान न स्वीकारणार्‍यांना महाराष्ट्र मतपेटीतून जलील करेल, हे नक्की. तूर्तास हे महाराष्ट्राच्या नजरेतून जलीलच आहेत.




खरे महाराष्ट्रद्रोही




मली पदार्थाच्या आडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव आहे, असे साहेबांनी म्हटले. लगेचच त्यांच्या लोकल चाणक्यांनी म्हणजे संजय यांनीही म्हटले की, “जणुकाही महाराष्ट्रात घराघरात गांजा पिकवतात, असे वातावरण तयार केले जात आहे. महाराष्ट्राला बदनाम केले जात आहे.” सत्तेच्या हस्तिदंती मनोर्‍यात बसणार्‍या या नेत्यांनी जरा सत्तेच्या नादातून बाहेर यावे आणि पाहावे. खरेच, महाराष्ट्र तर सोडाच; मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगरसारखी शहरे नशेच्या अधीन झाली आहेत. शहरे कुणाची? हा प्रश्न शोधण्यासाठी या नेत्यांनी जरा शहरातील वस्त्यांमधून फेरफटका मारावा. काय दृश्य आहे? गरीब-श्रीमंत आणि सर्व जाती-धर्माची मुलं-मुली या नशेच्या जाळ्यात अडकतीलच, असेच वातावरण आहे.





गल्लोगल्ली नशेचा बाजार होतोय. सहज नशा उपलब्ध होतेय. नशा खरेदी करण्यासाठी पैसे नसतील, तर चोरीमारी करणे आणि तेही शक्य झाले नाही, तर देहविक्री करणे, अशा चक्रात पिसली जाणारी तरुणाई गल्लोगल्ली दिसेल. हे सगळे बिनबोभाट चालले आहे. प्रत्येक परिसरातले जागरूक नागरिक याविरोधात आवाज उठवतात. प्रत्येक पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारीही असतील. पण, त्या तक्रारीचे काय होते? आपण पाहतो की, समाजात विद्रोह पसरून समाज तुटावा म्हणून प्रयत्न करणार्‍यांच्या समर्थनासाठी ठरावीक चेहर्‍याचे लोक पुढे येतात. मानवी हक्क, पुरोगामित्व, सहिष्णुता वगैरे शब्दांच्या मुखवट्याआड गुन्हेगारांचा बचाव करतात. महाराष्ट्रात सध्या हाच पॅटर्न वापरत नशेखोरांना वाचविण्यासाठी ठरावीक लोक पुढे येत आहेत. अमली पदार्थांचा वापर होत असेल आणि केंद्रीय प्रशासकीय यंत्रणा जर त्यावर कारवाई करत असतील, तर यात महाराष्ट्राची बदनामी कशी काय बरं होते? महाराष्ट्रात कोरोना नं. १ होताना, महाराष्ट्रात सुशांत, दिशा, पूजा मृत्यू, तसेच हिरन आणि ‘त्या’ दोन साधूंची हत्या होताना, महाराष्ट्राचे गृहमंत्री बेपत्ता होताना महाराष्ट्र बदनाम झाला नाही का? महाराष्ट्राला जर नशेचा विळखा पडत आहे, तर तो वेळीच निर्दयपणे ठेचला पाहिजे. नशेखोरांवर, नशेच्या व्यापारांवर कडक आणि कठोर कारवाई झालीच पाहिजे. त्यात महाराष्ट्राची बदनामी होते, असे म्हणून आडकाठी करणारे हे खरे महाराष्ट्रद्रोही.










@@AUTHORINFO_V1@@