
परंतु पुणे विभागीय आयुक्त, पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त अहवालानंतरच नगरपरिषद स्थापन करण्याची कार्यवाही केली जाईल असे या बैठकीत ठरवण्यात आले .
हिंजेवाडीमध्ये आंतरराष्ट्रीय माहिती आणि तंत्रद्यान सेवा देणाऱ्या कंपन्या आहेत. त्यामुळे मूलभूत सुविधांच्या विकासासाठी नवीन नगरपरिषद स्थापन केल्या शिवाय पर्याय नाही. हिंजवडीसह ६ गावे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अख्यारीत येतात. या सहा गावांचा विकास आराखडा देखील पीएमआरडीए मार्फत तयार आहे.