शेतकऱ्यांना फसवलं म्हणून राजीनामा द्या !

माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचं अशोक चव्हाण यांना थेट आव्हान

    21-Oct-2021
Total Views |

ashok chavan_1  


माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचं अशोक चव्हाण यांना थेट आव्हान



नांदेड:
पिक विमा कंपनी राज्य सरकारशी करार केलेला आहे तो करार करताना राज्य सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने करार केला आहे या करारानुसार जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या यंत्रणेने केलेले पंचनामे पीक विमा कंपन्यांना मान्य नाहीत त्यामुळे पीक विमा कंपनी मालक आणि राज्य सरकार गुलाम बनले आहे अशा शब्दात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

पिक विमा कंपनीशी करण्यात आलेल्या चुकीच्या कराराबाबत केंद्र सरकार जबाबदार असून केंद्र सरकार मुळीच पिक विमा मिळत नाही असा आरोप काल अशोक चव्हाण यांनी देगलूर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आयोजित सभेत केला होता समाचार घेताना लोणीकर यांनी अशोक चव्हाण यांनी केलेले आरोप खोडून काढा राज्यसरकारने दलाली खाऊन पिक विमा कंपन्यांचे गुलाम बनले आहेत असा घणाघाती आरोप केला.


तत्कालीन मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात पिक विमा कंपन्यांशी केलेला शेतकऱ्यांच्या हिताचा होता म्हणून सातत्याने तीन वर्षे दुष्काळ पडून देखील पिक विमा कंपन्यांनी भरघोस पीक विमा दिला परंतु महा विकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात हा करार बदलण्यात आला बदललेल्या करारानुसार पिक विमा कंपन्या प्रशासनाने केलेले पंचनामे मान्य करत नाहीत आणि पीक विमा कंपनीकडे पंचनामे करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही ऑनलाईन पीक पाणी बहुतांश शेतकऱ्यांना करता आली नाही परिणामी शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही राज्य सरकारला सुद्धा पिक विमा कंपन्यांकडून दलाली मिळाली आहे की काय म्हणून राज्यसरकार सुद्धा गप्प आणि पीक विमा कंपन्यांच्या बाजूने आहे असेही लोणीकर यावेळी म्हणाले.

निवडणुकीच्या अनुषंगाने अशोकराव चव्हाण शेतकऱ्यांची व सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करत असून अशोकराव चव्हाण यांनी "राज्य सरकारने खाल्लेली दलाली मान्य करावी आणि प्रायश्चित्त म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि जर असं नसेल तर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राज्य सरकारने पिक विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत व शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून द्यावा मी स्वतः नांदेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अशोक सामान्यांचा जाहीर सत्कार करेल" अशा शब्दात लोणीकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री त्याचा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना थेट आव्हान दिले आहे.