आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला; 'या' कारणामुळे जामीन अर्ज फेटाळला

    20-Oct-2021
Total Views |
aaryan khan _1  



मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन बुधवारी सत्र न्यायालयाने फेटाळला. यामुशे आर्यनचा तुरुंगातील मुक्काम पुन्हा काही दिवसांनी वाढला आहे. एनडीपीएसच्या विशेष न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. मुंबईतील क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान तीन ऑक्टोबरपासून एनसीबीच्या कोठडीत आहे.



आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनुमन धामेचा या तिघांचाही जामीन अर्ज मुंबईतील विशेष एनडीपीएस कोर्टाने फेटाळून लावला आहे. आर्यनची अधिक चौकशी करण्यासाठी एनसीबीने त्याची कोठडी मागितली आहे. आर्यनचा संपूर्ण कटात समावेश असल्याता आरोप एनसीबीने केला आहे. त्यामुळे आर्थर रोड तुरुंगातील तिघांचा मुक्काम वाढला आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही व्ही पाटील यांनी या प्रकरणावर सुनावणी घेतली. गेल्या गुरुवारी न्यायालयात तिन्ही आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली होती. पण न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. बुधवारी यासंदर्भात निकाल देण्यात आला. यावेळी आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला. आर्यनने ड्रग्ज बाळगले नसले तरी, तो क्रूझवर जाऊन ड्रग्जची खरेदी करणार होता आणि त्यासंदर्भात व्हाॅट्सअॅप चॅट एनसीबीने कोर्टासमोर दाखवले. त्यामुळे या संपूर्ण कटाचा भाग म्हणनू आर्यनचा जामीन अर्ज नाकरण्यात आला. या निर्णयाविरोधात आर्यनचे वकील मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहेत.



आर्यन खान तुरुंगात गेल्यापासून त्याने फक्त एक दिवसच जेलचा चहा प्यायला आहे. तेव्हापासून तो फक्त बिस्किटे आणि चिप्स खात आहे. चहा नाकारून तो बिस्किटे पाण्यात बुडवून खात आहे. कारागृहातील आर्यन खानची ही स्थिती त्याच कारागृहातील आणखी एका कैद्याने सांगितली आहे, जो नुकताच तुरुंगाबाहेर आला आहे. इतर कैद्यांप्रमाणे आर्यन खान तिथे दिलेले कपडे घालत नाही. त्याने तेच कपडे घातले आहेत, जे त्याच्या पालकांनी त्याला घरून पाठवले होते. तो ४५०० रुपयांच्या मनीऑर्डरने फक्त पाणी, बिस्किटे आणि चिप्स खरेदी करतो. त्याने असाही दावा केला आहे की, आर्यनला त्याने आणि तुरुंगातील अधिकाऱ्यांकडून अनेक वेळा जेवण खाण्यास सांगितले होते, पण त्याने प्रत्येक वेळी नकारच दिला. तो भूक लागत नाही असे म्हणायचा. तो कैद्यांना पुरवले जाणारे अन्न नक्कीच घेतो, पण इतर कैद्यांना वाटून टाकतो.