बांगलादेशमध्ये नौखालीची पुनरावृत्ती?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Oct-2021   
Total Views |

ISCKON_1  H x W
 
 
 
धर्मांध मुस्लिमांनी ज्या इस्कॉन मंदिरावर हल्ला केला ते मंदिर आताच्या बांगलादेशमधील नौखाली भागात आहे. याच नौखालीमध्ये ऑक्टोबर १९४६मध्ये ‘मुस्लीम लीग’च्या आदेशावरून तेथील हिंदू समाजावर प्रचंड हल्ले झाले होते. ‘मुस्लीम लीग’चे महम्मद अली जिना यांच्या आदेशाने हिंदू समाजावर झालेल्या हल्ल्यांमध्ये सुमारे पाच हजार हिंदूंची हत्या करण्यात आली! असंख्य हिंदू महिलांवर अत्याचार करण्यात आले.
 
पूर्ण बंगालमध्ये दुर्गापूजा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पूर्व बंगाल म्हणजे आताच्या बांगलादेशातही तेथील हिंदू समाजाकडून दुर्गा उत्सव साजरा केला जात असतो. पण, अलीकडील काही काळात धर्मांध मुस्लिमांनी हिंदू समाजास लक्ष्य करण्याचे ठरविले असून, तेथील हिंदू समाज, हिंदूंची मंदिरे यांच्यावर ठरवून हल्ले करण्याचे प्रकार घडत आहेत. यंदाच्या दुर्गापूजेदरम्यान अनेक दुर्गापूजा मंडपांवर हल्ले करण्यात आले; तसेच त्या मंडपातील मूर्तीची विटंबना करण्यात आली. एवढेच नव्हे, तर बांगलादेशातील धर्मांध मुस्लिमांनी नौखाली भागातील इस्कॉन मंदिरावर हल्ला केला. इस्कॉन मंदिरातील विविध देवदेवतांच्या मूर्तींची विटंबना करण्याबरोबरच त्या मंदिराची हल्लेखोरांनी नासधूस केली. तेथील पार्थ दास नावाच्या एका उपासकाची हत्या केली. शुक्रवारच्या नमाजनंतर अंदरकिल्ला जुम्मन मशिदीच्या दरवाजावर काही धर्मांध मुस्लीम जमले आणि त्यानंतर मंदिरावर हल्ला होण्याची घटना घडली. बांगलादेशमधील या हिंसाचारात पाच जणांची हत्या झाली.
 
 
 
हिंदू समाजावर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी बांगलादेश सरकारने त्वरित पावले उचलावीत तसेच सर्व हिंदू सुरक्षित राहतील या दृष्टीने पावले टाकावीत, अशी मागणी इस्कॉनने बांगलादेश सरकारकडे केली आहे. इस्कॉन मंदिरावर हल्ला होण्याच्या घटनेच्या आधी धर्मांध मुस्लिमांकडून १३ ऑक्टोबरपासून विविध दुर्गापूजा मंडपांवर हल्ले केले जात होते. धर्मांध मुस्लिमांकडून या हल्ल्यांचे समर्थनही केले जात होते. हिंदू समाजाकडून कुराणाचा अवमान झाल्याने हे हल्ले करण्यात आल्याचे समर्थन करण्यात आले. पण, हे हल्ले घडू नयेत म्हणून बांगलादेश सरकारकडून काही ठोस उपाययोजना करण्यात आल्याचे दिसून आले नाही.
 
धर्मांध मुस्लिमांनी ज्या इस्कॉन मंदिरावर हल्ला केला ते मंदिर आताच्या बांगलादेशमधील नौखाली भागात आहे. याच नौखालीमध्ये ऑक्टोबर १९४६मध्ये ‘मुस्लीम लीग’च्या आदेशावरून तेथील हिंदू समाजावर प्रचंड हल्ले झाले होते. ‘मुस्लीम लीग’चे महम्मद अली जिना यांच्या आदेशाने हिंदू समाजावर झालेल्या हल्ल्यांमध्ये सुमारे पाच हजार हिंदूंची हत्या करण्यात आली! असंख्य हिंदू महिलांवर अत्याचार करण्यात आले. नौखालीत हिंदू समाजावर जे हल्ले झाले, त्या हल्ल्यांचा सूत्रधार होता हुसेन शाहीद सुर्‍हावर्दी. हाच सुर्‍हावर्दी पुढे पाकिस्तानचा पंतप्रधानही झाला होता. ‘मुस्लीम लीग’चे महम्मद अली जिना यांनी, हिंदू समाजावर थेट कृती करण्याचे आदेश दिल्यानंतर नौखालीतील हिंदू समाजावर अनन्वित अत्याचार झाले. जीवाच्या भीतीने लाखो हिंदूंनी त्या भागातून स्थलांतर केले. नौखालीतील अत्याचारांची माहिती कळताच महात्मा गांधी यांनी नौखालीकडे धाव घेतली. पण, त्यांनाही तेथील दंगल शमविण्यात यश आले नाही. नौखालीतील दंगलीला सुऱ्हावर्दी जबाबदार असल्याचा आरोप महात्मा गांधी यांनी केला. हा सर्व इतिहास २०२१मध्ये पुन्हा आठवण्याचे कारण म्हणजे पुन्हा याच नौखालीमध्ये धर्मांध मुस्लिमांकडून हिंदू समाजावर, दुर्गापूजा उत्सवांवर हल्ले करण्यात आले.
 
शेजारच्या बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर, मंदिरांवर जे हल्ले झाले त्यांचा प. बंगाल विधानसभेतील विरोधी नेते सुवेंदू अधिकारी यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध नोंदविला. या संदर्भात सुवेंदू अधिकारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि प. बंगालचे राज्यपाल जगदीश धनकड यांना, “बांगलादेशमध्ये सनातनी हिंदूंवर जे हल्ले होत आहेत, ते रोखण्यासाठी आणि आपत्तीत सापडलेल्या हिंदू समाजास आधार देण्यासाठी त्वरित पावले उचलावीत,” असे आवाहन ट्विटरद्वारे केले. बांगलादेशमधील सनातनी लोकांची अवस्था अत्यंत वाईट असल्याचे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पात्रात म्हटले आहे. एवढा सगळा हिंसाचार घडल्यानंतर हिंदूविरोधी हिंसाचारात सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी दिले आहे.
 
बांगलादेशमध्ये तेथील हिंदू समाजावर झालेल्या हल्ल्यांचा तृणमूल काँग्रेस सरकारने ठोसपणे निषेध करायला हवा होता. पण, तशी आक्रमक कृती प. बंगाल सरकारकडून घडल्याचे दिसून आले नाही. उलट भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी जे वक्तव्य केले, त्यामध्ये तृणमूल काँग्रेस आणि त्या पक्षाच्या समर्थकांना राजकारण दिसून आले. येत्या ३० ऑक्टोबर रोजी प. बंगालमध्ये होणाऱ्या चार विधानसभा पोटनिवडणुकीसाठी, बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर जे अत्याचार झाले, त्याचे भारतीय जनता पक्ष भांडवल करू पाहत आहे, असा आरोप तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला. तर ममता बॅनर्जी यांचे सरकार प. बंगालला प. बांगलादेश बनवू पाहत आहे, असा आरोप प. बंगालमधील भाजपनेत्यांनी केला आहे. खरे म्हणजे बांगलादेशमधील हिंदू समाजावर झालेल्या अत्याचाराविरुद्ध सर्व हिंदू जनतेने एकमुखाने आवाज उठविणे अत्यावश्यक होते. पण, प्रत्येक विषयांमध्ये मतांचे राजकारण खेळणाऱ्या राजकीय पक्षांकडून दुसरी काय अपेक्षा करता येणार!
सोनिया-राहुल यांच्याशिवाय पर्याय नाही?
 
देशातील काँग्रेस पक्ष हा ‘ग्रॅण्ड ओल्ड पार्टी’ म्हणून ओळखला जातो. पण, सध्या या पक्षाची अवस्था खूपच वाईट झाली आहे. ज्या काँग्रेस पक्षाचे नेतृत्व अनेक महान नेत्यांनी केले, त्या काँग्रेस पक्षाला नेतृत्व करण्यासाठी नेहरू-गांधी घराण्याव्यतिरिक्त अन्य कोणी सक्षम व्यक्ती सापडू नये, याला काय म्हणावे! सध्या जो काँग्रेस पक्ष आहे, तो नेहरू-गांधी घराण्याभोवतीच फिरत असल्याचे दिसून येत आहे. त्या पक्षात जे नेते आणि कार्यकर्ते आहेत, त्यांना पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यापलीकडे कोणाची नावेच सुचत नाहीत. गेल्या वर्षी काँग्रेस पक्षातील ‘जी-२३’ या नावाने ओळखल्या गेलेल्या गटाने पक्षामध्ये आमूलाग्र बदल करण्याची मागणी केली होती. पण, त्या मागणीचा सकारात्मक विचार करण्याऐवजी या गटाचे जे म्होरके होते, त्यांच्यावरच राग व्यक्त करण्यात आला. अगदी अलीकडे याच ‘जी-२३’ गटाने पक्षाला अध्यक्ष नसल्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसला कोणी अध्यक्ष नसल्याचे निर्णय कोण घेत आहे तेच कळत नाही, अशी टीका या गटाने केली होती. पक्षास अध्यक्ष नसल्याने मस्तकहीन शरीरासारखी पक्षाची अवस्था झाली असल्याची टीका कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद आदींच्या नेतृत्वाखालील या गटाने केली होती. पण, या गटाने जे म्हणणे मांडले, त्यावर विचार करण्याऐवजी कपिल सिब्बल यांच्यासारख्या नेत्यांच्या घरासमोर काँग्रेस पक्षाकडून निदर्शने करण्यात आली. ‘जी-२३’ गटाने पक्षांतर्गत निवडणुका घेण्यात याव्यात, पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्ष असायला हवा, अशा मागण्याही केल्या होत्या. या ‘जी-२३’ गटाने जी बंडाळी केली ती लक्षात घेऊन दोन दिवसांपूर्वी काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक झाली. त्यामध्ये पुढील वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत पक्षांतर्गत निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचवेळी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा असलेल्या सोनिया गांधी यांनी, आपणच सध्या पक्षाचे पूर्ण वेळ अध्यक्षा असल्याचे बंडखोरांना बजावले. पुढील निवडणूक होईपर्यंत आपणच अध्यक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
काँग्रेस कार्यकारी समितीच्या त्या बैठकीत उपस्थित सदस्यांनी माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा पक्षाध्यक्ष व्हावे, असा आग्रह करण्यात आला. त्यावर विचार करू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले. याचा अर्थ स्पष्ट आहे, पुढील वर्षी होणाऱ्या पक्षांतर्गत निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांची पक्षाध्यक्षपदी निवड होणार. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली २०२४च्या लोकसभा निवडणुका काँग्रेस पक्ष लढविणार! एकदा पक्षाध्यक्षपदी राहिलेल्या राहुल गांधी यांची अध्यक्ष म्हणून कारकिर्द कशी अपयशी ठरली हे सर्व जाणत आहेत. त्यामुळे पुन्हा अध्यक्षपद स्वीकारायचे आणि निवडणुकांना सामोरे जायचे म्हटल्यावर त्याचा काय परिणाम होईल हे सुज्ञ जनतेस सांगायलाच नको!
@@AUTHORINFO_V1@@