पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांना रविवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व सौरभ गाडगीळ यांच्या हस्ते ‘कोरोना वॉरियर पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. पनवेलमधील सुप्रसिद्ध पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स यांच्यावतीने ‘जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थे’च्या माध्यमातून ‘कोविड’ काळात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.
‘जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थे’च्या माध्यमातून ‘कोविड’ काळात प्रीतम म्हात्रे यांनी समाजाभिमुख काम करत अनेक गरजूंना मदतीचा हात दिला. हजारो गबांना जेवण, अन्नधान्य, आर्थिक मदत त्यांनी कोरोना महामारीच्या काळात केले. त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना कोरोना वॉरियर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.