फैज हमीद यांच्या गच्छंतीचे अर्थ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

फैज हमीद यांच्या गच्छंतीच
 
 
फैज हमीद यांच्या पेशावर ‘कोअर कमांडर’च्या रुपात केलेल्या नियुक्तीने त्यांच्यासाठी आगामी लष्करप्रमुख होण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे. कारण, पाकिस्तानी लष्कराच्या कायद्यांतर्गत लष्करप्रमुख होण्यासाठीच्या आवश्यक पात्रतेत कोअर कमांडरच्या रुपात किमान सहा महिन्यांचा कार्यकाळ अनिवार्य आहे.
 
एका देशाच्या रुपात अस्तित्वात आल्यानंतर इतिहासाच्या लघु कालखंडात पाकिस्तानात झालेल्या महत्त्वपूर्ण सामरिक आणि राजकीय घटनाक्रमात लष्कराची समन्वित गुप्तचर संस्था ‘इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स-आयएसआय’चे महत्त्वाचे योगदान आहे. पाकिस्तानमध्ये लष्करी तख्तापलट असो वा शेजारी देशांबरोबर युद्ध अथवा तिथे दहशतवादाचा प्रसार ‘आयएसआय’ने सदैव पुढाकार घेतला.
 
 
नुकताच पाकिस्तानमध्ये एका महत्त्वाच्या घटनाक्रमांतर्गत ‘आयएसआय’च्या नेतृत्वात बदल करण्यात आला आहे. ‘आयएसआय’चे आतापर्यंत प्रमुखपद सांभाळलेले लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांना पदावरून हटवण्यात आले असून त्यांच्या जागेवर लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम यांना प्रमुखपदी बसवण्यात आले आहे. त्याआधी ‘नदीम अंजुम कराची कोअर’चे कमांडर होते.
 
 
फैज हमीद आणि तालिबान
 
अफगाणिस्तानमध्ये ज्या प्रकारे वेगाने तालिबानने सत्तेवर ताबा मिळवला, त्या सर्वात ’आयएसआय’ आणि फैज हमीद यांची मुख्य भूमिका होती. ऑगस्टच्या दहा दिवसांत ज्या वेगाने तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला आणि दि. ७ सप्टेंबरला आपल्या सरकारची घोषणा केली, ते अतिशय आश्चर्यकारक आहे. पण अफगाणिस्तानमधून अमेरिकन लष्कराची माघारी आणि तिथल्या लोकशाही सरकारचे पतन आणि तालिबानच्या सत्तारोहणात पाकिस्तानची भूमिका नाकारली जाऊ शकत नाही. पाकिस्तानकडून ही मोहीम चालवणारे ‘आयएसआय’चे प्रमुख फैज हमीद हेच होते.
 
 
दि. ४ सप्टेंबरचा ‘आयएसआय’ प्रमुख फैज हमीद यांचा काबुल दौरा अशा वेळी झाला, ज्यावेळी पाकिस्तानवर अफगाणिस्तानमध्ये तालिबानला साहाय्य करण्याचा जागतिक पातळीवर आरोप लावला जात होता. उल्लेखनीय म्हणजे, या दौर्‍यावर ‘पेंटागॉन’चे माजी अधिकारी मायकल रुबिन म्हणाले होते की, “हा दौरा, ज्याला अफगाणिस्तानच्या बदलत्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठीचा आपत्कालीन दौरा म्हटले गेले, तो सिद्ध करतो की, तालिबान केवळ ‘आयएसआय’ची कठपुतळी आहे.”
 
उल्लेखनीय म्हणजे, तालिबान आणि अन्य कट्टरपंथीय दहशतवादी संघटनांमध्ये सरकार स्थापनेवरून गतिरोध निर्माण झाला, त्यावेळी ‘आयएसआय’प्रमुख फैज हमीद यांनी तालिबानच्या मुल्ला बरादर आणि ‘हक्कानी नेटवर्क’दरम्यान तडजोडीसाठी महत्त्वाची भूमिका निभावली. उल्लेखनीय म्हणजे, पाकिस्तान सरकार आणि माध्यमांद्वारे या दौर्‍याला अशाप्रकारे प्रचारित केले गेले की, जसे काही फैज हमीद तालिबानच्या आमंत्रणावरून काबुलला गेले आहेत. परंतु, तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचे उपप्रमुख अहमदुल्लाह वासिक यांनी स्पष्ट केले की, “हा दौरा पाकिस्तानच्या आग्रहाने झाला, तालिबानच्या नव्हे.”
 
 
उल्लेखनीय म्हणजे, पाकिस्तानसाठी तालिबान सरकारबाबत अनेक चिंताजनक मुद्दे होते. तालिबान सरकार स्थापन व्हावे आणि त्यांच्या नेत्यांच्या एखाद्या कृतीने जगात पुन्हा एकदा तालिबानविरोधात वातावरण तयार न व्हावे आणि पाकिस्तानकडून त्याला पुन्हा एकदा आपला अधिनस्थ सहकारी बनवण्याची संधी निसटून न जावी, ही पाकिस्तानची स्पष्ट आणि उत्कट इच्छा होती. सोबतच पाकिस्तान असेही प्रयत्न करत होता की, यात तालिबानबरोबर त्याने पोसलेल्या अन्य दहशतवादी संघटनाही सामील व्हाव्यात, जेणेकरुन त्यावर नियंत्रण प्रस्थापित करणे सोपे होईल. वास्तवात पाकिस्तानकडून सर्वसमावेशक सरकारच्या स्थापनेचा अर्थ हाच होता.
 
 
 
अखेर फैज हमीद यांना का हटवले गेले?
 
फैज हमीद यांच्या गच्छंतीचे अनेक अर्थ काढले जात आहेत. एका बाजूला जगभरात अफगाणिस्तानवरुन पाकिस्तानविरोधी वातावरण तयार झाले. परिणामी, फैज हमीद यांच्यावर त्याचे खापर फोडले जाणे स्वाभाविक होते. परंतु, पाकिस्तानने याच्या कितीतरी अधिकची फजिती वा टीका सातत्याने सहन केली आहे. त्यामुळे या परिस्थितीत तो अचानक संवेदनशील होईल, असे वाटत नाही.
 
लष्कप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचे निकटवर्तीय मानल्या जाणार्‍या फैज हमीद यांनी अडीच वर्षांपर्यंत ‘आयएसआय’चे नेतृत्व केले. पाकिस्तानमध्ये ज्यावेळी अंतर्गत सुरक्षेची आव्हाने प्रबळ होत होती, त्यावेळी त्यांना ‘आयएसआय’ प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते. सोबतच हमीद यांचे पंतप्रधान इमरान खान यांच्याबरोबरील जवळचे संबंध लपून राहिले नव्हते. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी फैज हमीद यांच्यावर उघड आरोप केला होता की, ते आमच्या पक्षाच्या नेत्यांवर इमरान खान यांच्या ‘तहरिक-ए-इन्साफ’ पक्षात सामील होण्यासाठी दबाव आणत आहेत. सोबतच बलुचिस्तानमध्ये आपल्य नृशंस कारवायांसाठी कुख्यात असलेले व एप्रिलमध्ये लेफ्टनंट जनरल झालेले फैज हमीद, इमरान खान यांच्यासाठी जनरल बाजवांचे उपयुक्त उत्तराधिकारीदेखील होऊ शकतात. उल्लेखनीय म्हणजे, बाजवांचा कार्यकाळ नोव्हेंबर २०२२ मध्ये संपणार आहे.
 
 
 
फैज हमीद यांच्या पेशावर ‘कोअर कमांडर’च्या रुपात केलेल्या नियुक्तीने त्यांच्यासाठी आगामी लष्करप्रमुख होण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे. कारण, पाकिस्तानी लष्कराच्या कायद्यांतर्गत लष्करप्रमुख होण्यासाठीच्या आवश्यक पात्रतेत कोअर कमांडरच्या रुपात किमान सहा महिन्यांचा कार्यकाळ अनिवार्य आहे. सोबतच फैज हमीद यांना शिक्षा म्हणून हटवण्यात आले असते तर त्या परिस्थितीत त्यांना पेशावरसारख्या महत्त्वपूर्ण कोअरचा प्रमुख म्हणून नियुक्त करणे कोणत्याही दृष्टीने योग्य ठरले नसते. विशेषत्वाने अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या सत्ताग्रहणानंतर. कारण, आता पाकिस्तानचा पश्चिम आणि उत्तर पश्चिम सीमांत सामरिकरुपाने महत्त्वाचा झाला आहे आणि पेशावर कोअरच्या भूमिकेतही वाढ झाली आहे. दुसरीकडे हमीद यांच्या जागेवर ‘आयएसआय’च्या प्रमुखाच्या रुपात नियुक्त केलेल्या जनरल नदीम अंजुम यांना एक हाडाचा लष्करी अधिकारी मानले जाते आणि अशा अधिकार्‍यांकडून, ते पाकिस्तानी लष्करप्रमुखांचे आज्ञाधारक राहतील, आशा केली जाते.
 
 
(अनुवाद - महेश पुराणिक)
@@AUTHORINFO_V1@@