राऊतांच्या मनमानी कारभाला कर्मचारी हैराण, केली थेट सीएमकडे तक्रार!

    13-Oct-2021
Total Views |
nitin raut _1  


मुंबई - राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात वीज कामगार महासंघाने लिहलेले पत्र व्हायरल झाले आहेत. हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहले आहे. या पत्रामध्ये राऊत यांच्या चुकीची धोरणं आणि कथीत वसुलीबाबतचा पाढा मुख्यमंत्र्यांसमोर वाचवण्यात आाला आहे.


राज्याचे उर्जामंत्री यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर निशाणा साधला. राज्यामध्ये कोळश्याची टंचाई निर्माण सांगत असताना त्यांनी  केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कोल इंडियाच देशातील वीज प्रकल्पांतील कोळसाटंचाईला आणि पर्यायाने वीजटंचाईला जबाबदार आहे आणि या विषयावर भाजपचे नेते देशाची दिशाभूल करत असल्याचे स्पष्ट होते, असे म्हटले. राऊतांनी केंद्र सरकारवर केलेल्या या टीकेला २४ तास उलटच नसतानाच, नागपूरातील वीज कामगार महासंघांने महिनाभरापूर्वी राऊत यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांना लिहलेले पत्र व्हायरल झाले आहे.


नागपूरचा वीज कामगार महासंघ हा उर्जा विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मोठा नोंदणीकृत संघ आहे. या संघाने १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राऊतांच्या अकार्यक्षमतेचा पाढा वाचला आहे. आता हे पत्र व्हायरल झाले आहे. वसुलीच्या नावाखाली उर्जामंत्र्यांनी सर्व स्तरावरील कामगारांना नियमबाह्य काम करण्यास सांगितल्याचा आरोप या पत्रामध्ये करण्यात आला आहे. वीजेची थकबाकी वसूल करण्यासंदर्भातील मंत्र्यांच्या चुकीच्या धोरणामुळे कर्मचाऱ्यांना मारहाण,मनस्ताप आणि त्रास सहन करावा लागल्याचे पत्रात म्हटले आहे. प्रशासनाची एकंदरीत वर्तुवणूक पाहून हे राज्य इंग्रजांच की लोकशाहीचं, असं पत्रात नमूद करण्यात आलंय.



मंत्री अशासकीय कामं करण्यास भाग पाडत आहेत, ही कामं न केल्यास कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येत असल्याचेआरोप पत्राच्या माध्यमातून करण्यात आला आहे. लाॅकडाऊनच्या काळात कोणीही मागणी केली नसताना उर्जामंत्र्यांनी वीजेचे देयक माफ करु असे म्हटले. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला, म्हणूनच राज्यातील वीजेची थकबाकी वाढली असून त्याला नितीन राऊत जबाबदार असल्याचे पत्रात म्हटलंय.