शिवसैनिकांच्या हिसांचारानंतर प्रियंका चतुर्वेदींकडून शिवसेना विरोधातील 'ते' टि्वट डिलीट

    12-Oct-2021
Total Views |
shivsena _1  H



मुंबई -
ठाणे आणि मुंबईमध्ये सोमवारी महाविकास आघाडीने उत्तर प्रदेशातील लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देऊन मोर्चे काढले. यावेळी शिवसैनिकांनी ठाण्यामध्ये हिंसाचार करत रिक्षा चालकांना बेदम मारहाण केली. या घटनेनंतर काॅंग्रेसमधून शिवसेनेत पक्षांतर करुन खासदारकी मिळवलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांनी शिवसेनेविरोधात केलेले सगळे जुने टि्वट डिलीट करुन टाकले.




शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी शिवसेना विरोधात केलेले जुने टि्वट हटवले आहेत. या टि्वटमध्ये त्यांनी शिवसैनिकांकडून केलेल्या हिंसाचाराचा निषेध केला होता. १०१५ मध्ये प्रियंका चतुर्वेदी काँग्रेस पक्षासोबत होत्या आणि शिवसेनेला वैचारिक अस्पृश्य मानत होत्या. २०१५ मध्ये त्यांच्यासाठी शिवसेना हा पक्ष हिंदुत्ववादी झाला होता. त्यानंतर २०१९ मध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे २०१९ मध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी म्हटले होते की, त्यांनी आपले पूर्वीचे कोणतेही ट्विट डिलीट न केल्याचा आनंद आहे. ती म्हणाली, “मला खूप आनंद आहे की मी माझे पूर्वीचे कोणतेही ट्वीट डिलीट केलेले नाही. ते टि्वट मी ट्रोल्सना रोजगार देण्यासाठी ठेवते. तेवढेच माझे अपयशी अर्थव्यवस्थेत माझे योगदान."