श्रीराम मंदिरासाठी मुंबईच्या ‘डब्बेवाला संघटने’चा पुढाकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2021
Total Views |

dabewala_1  H x
मुंबई : श्रीराम जन्मभूमी मंदिरनिर्माणाच्या निधी संकलनाची विश्व हिंदू परिषदेच्या वतीने १५ जानेवारीपासून सुरुवात केली जाणार आहे. या निधी संकलनाच्या मोहिमेमध्ये मुंबईच्या डब्बेवाला संघटनेने पुढाकार घेतला आहे. नुकतीच दादरमधील रानडे रोडवरील डब्बेवाला संघटनेच्या मुख्य कार्यालयामध्ये याबाबत घोषणा करण्यात आली.यावेळी संघटनेचे मुंबई अध्यक्ष उल्हासभाऊ शांताराम मुके, खजिनदार जयसिंग पिंगळे व अशोक कुंभार, सदस्य कैलास शिंदे, रितेश आंद्रे व विश्व हिंदू कोकण प्रांत सहमंत्री, राष्ट्रीय प्रवक्ते श्रीराज नायर व विहिंप प्रांत प्रचार-प्रसार व विभागाचे प्रशांत जनार्दन पळ आदींच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. मुंबई अध्यक्ष उल्हासभाऊ मुके म्हणाले की, “कोरोनाकाळामध्ये संघटनेचे सदस्य आर्थिक संकटामध्ये असून, सदस्यांना मदत मिळण्याबाबत सरकारदरबारी विनंती केली गेली. सदस्य आर्थिक संकटामध्ये असतानाही श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने आमची आठवण केली, त्याबद्दल आम्ही श्रीराज व प्रशांत यांचे आभार मानून संघटनेचे सर्व सदस्य या मोहिमेमध्ये सहभागी होणार आहोत.”
@@AUTHORINFO_V1@@