शासनाने रायगडप्रेमी सुरेश वाडकर यांना साथ देण्याची गरज होती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2021
Total Views |

s_1  H x W: 0 x 
 
 
 
 
 
डोंबिवली (जान्हवी मौर्ये) : आपला इतिहास एका पिढीकडून दुस:या पिढीकडे नेण्यासाठी सिंहाचा वाटा उचलणारे रायगडप्रेमी सुरेश वाडकर यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने इतिहास एका पिढीकडून दुस:या पिढीकडे संक्रमीत करणारे लोक फारच कमी राहिले आहेत. सुरेश वाडकर यांना शासनाने साथ देणे गरजेचे होते. आपण या व्यक्तीला जपले नसल्याची खंत त्यांचे मित्र सतीश चाफेकर यांनी व्यक्त केली आहे.
 
 
वाडकर यांनी किल्ले रायगडावर एक हजार आठ वेळा जाण्याचा संकल्प करून रायगड परिसर किल्ले रायगडाच्या विविध भागाची खडान्खडा माहिती गोळा करण्याचे काम केले. वाडकर हे डोंबिवलीचे रहिवासी होते. डोंबिवली पूव्रेतील गांधीनगर परिसरात त्यांनी वास्तव्य केले होते. अलीकडेच्या काही वर्षात त्यांनी डोंबिवली सोडली होती. किल्ले रायगड परिसरातील कोंझर हे त्यांचे जन्मगाव होते. मुंबई येथील कलरकेम कंपनीत काम करीत असताना त्यांची रायगड किल्ल्याशी मैत्री झाली. त्यांनी १९६७ पासून रायगड भ्रमंती आणि १९९० पासून त्यांनी डोंबिवली ते रायगड पायी प्रवास करत किल्ले रायगड एक हजार आठ वेळा सर करण्याचा संकल्प केला. आपल्या रायगड भेटीत त्यांनी किल्ल्यांचा परिपूर्ण अभ्यास केला आहे. वनस्पती, विषारी-बिनविषारी सर्प, पक्षी आदींचे ते हुबेहुबे आवाज काढत असत. त्यांनी सुमारे ४ लाख ५० हजार शिवप्रेमींना रायगडचे दर्शन घडविले. रायगड परिसर आणि निसर्ग या विषयावर आजर्पयत जवळपास १४७६ व्याख्याने संपूर्ण महाराष्ट्रात झाली आहेत.
 
 
सतीश चाफेकर यांची बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी ओळख वाडकर यांच्यामुळे झाली होती. २००१ साली गिरीश जाधव, सुरेश वाडकर आणि सतीश चाफेकर यांनी एक प्रदर्शन ठेवले होते. रेखीचा कार्यक्रम पण ठेवला होता. त्याकाळी पाच हजार रू. जमले होते अशा आठवणींना चाफेकर यांनी उजाळा दिला.
 
 
वाडकर यांच्याकडे नियोजन नव्हते. त्यांनी वेळेचे योग्य नियोजन केले असते तर ते एका उंचीवर आज गेले असते. कोणत्याही गोष्ट करताना ते मागचा -पुढचा विचार करीत नव्हते. कॅमेरा चांगल्या प्रतीचा नसताना ते उत्कृष्ट छायाचित्र काढत होते. प्रचंड आकलनशक्ती त्यांच्याकडे होती. मनस्वी माणूस होता. खाचखळगे असतील तर ते सांगणो गरजेचे होते. कामाने ते झपाटलेले होते. लोकांना बोलताना बांधून ठेवणे ही त्यांची कला होती. नियती आणि प्रकृतीने त्यांना फारशी साथ दिली नाही. विद्याथ्र्याच्या प्रश्नांना ते उत्तरे देत. नवीन पिढी त्यांच्यामागे होते. संघटनशक्ती त्यांच्याकडे होती. आपण या माणसाला जपले नाही. शासनाने मदत केली पाहिजे होती. वाडकर स्वत:च्या खर्चाने प्रदर्शन करीत होते. त्यासाठी शासनाने मदत करायला हवी होती. त्याला प्रमोट करण्याचे काम शासनाने करायला हवी होती. रायगडप्रेमी लोक आता फार कमी राहिले आहेत. नोकरी करून काम करणारे लोक आहेत. इतिहास सांगणे महत्त्वाची गोष्ट आहे. वाडकर तरूण वयापासून हे काम करीत होते. वाडकरांमुळे नवीन पिढीर्पयत हे काम पोहचत होते. नवीन पिढी या क्षेत्रकडे वळत नाही. आपण पोटार्थ झाले आहोत. ज्ञानार्थ होणे गरजेचे असल्याचे चाफेकर यांनी सांगितले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@