मुंबई वायू प्रदूषणाने बेहाल; दिल्लीपेक्षाही हवेची गुणवत्ता वाईट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2021
Total Views |

air pollution _1 &nb


हवेच्या गुणवत्तेचा स्तर अत्यंत वाईट'


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबईत आज हवेची गुणवत्ता दिल्लीपेक्षाही खालावली असल्याचे 'सफर'च्या आकडेवारीवरुन समोर आले आहे. आज मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा सर्वसाधारण निर्देशांक (एक्यूआय) ३१९ म्हणजे 'अत्यंत वाईट' स्तरावर नोंदवण्यात आला. तोच दिल्लीतील 'एक्यूआय' २२१ म्हणजे 'वाईट' स्तरावर होता. मुंबईत खालावलेल्या हवेच्या गुणवत्तेमुळे श्वसनाचा त्रास असलेल्या लोकांना आणि वुद्धांना आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. 


राज्यात थंडीचा पार वाढल्यापासून हवेची गुणवत्ता ढासळू लागली आहे. तापमानातील बदलाचा हा परिणाम येत्या काही दिवसांमध्ये कायम राहणार आहे. त्यामुळे वायू प्रदूषणातील वाढीमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. हवेमधील २.५ पीएम हे कण प्रदूषणास कारक असतात. उन्हाळ्यातील उष्ण हवा हलकी असल्याने हे प्रदूषित कण हवेसोबत उंचावर वाहून जातात. मात्र, हिवाळ्यात हवेतील आर्द्रता वाढते. त्यामुळे रात्री आणि पहाटेच्या वेळी धूलीकण जमिनीलगतच राहतात. परिणामी हिवाळ्यात धूर आणि धूक्यांचे मिश्रण होऊन धूरके तयार होते. त्यामुळे हवेचे प्रदूषण वाढते. मुंबईतील आज हवेच्या गुणवत्तेचा सर्वसाधारण 'एक्यूआय' ३१७ नोंदविण्यात आला. यावर्षी नोंदवलेला हा हवेचा सर्वात मोठा 'एक्यूआय' आहे. 


आज मुंबईत सर्वात वाईट हवेची गुणवत्ता कुलाबा परिसरात नोंदविण्यात आली. याठिकाणी 'एक्यूआय' ३५२ होता. त्यानंतर बीकेसी ३४६, मालाड ३३८, अंधेरी ३३३ 'एक्यूआय' नोंदवण्यात आला. मुंबईपेक्षा दिल्लीत हवेची गुणवत्ता ही मोठ्या प्रमाणात खालावलेली असते. याठिकाणी हवेचा 'एक्यूआर' ४०० च्या पुढे म्हणजेच 'धोकादायक' स्तरावर असतो. पण आज दिल्लीत 'एक्यूआय' २२१ 'वाईट' स्तरावरच होता. हवेच्या गुणवत्तेचा स्तर ० ते ५० (चांगली), ५१ ते १०० (समाधानकारक), १०१ ते २०० (मध्यम), २०१ ते ३०० (वाईट), ३०१ ते ४०० (अती वाईट) आणि ४०१ ते ५०० (धोकादायक) अशा प्रकारे मोजण्यात येतो. 

@@AUTHORINFO_V1@@