उत्तरप्रदेश; संकटग्रस्त रिव्हर डाॅल्फिनवर काठ्या-कुऱ्हाडीने वार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2021
Total Views |
river dolphin_1 &nbs


तीघांवर गुन्हा दाखल

मुंबई (प्रतिनिधी) - देशाचा राष्ट्रीय जलचर प्राणी असलेल्या रिव्हर डाॅल्फिनला उत्तरप्रदेशमध्ये गावकऱ्यांनी काठ्या-कुऱ्हाडीने वार करुन मारून टाकल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. प्रतापगड जिल्ह्यातील नवाबगंज याठिकाणी ही घटना घडली. भारतामध्ये केवळ गंगेच्या खोऱ्यात रिव्हर डाॅल्फिनचा अधिवास असून या प्रजातीच्या समावेश संकटग्रस्त प्राण्यांच्या यादीत होतो. या प्रकरणी तीघांना अटक करण्यात आली आहे. 
कासव, मगर आणि शार्कच्या काही प्रजातींसह जगातील सर्वात प्राचीन प्राणीांपैकी एक डॉल्फिन आहे. १८०१ साली गंगा नदीत अधिवास करणारे डॉल्फिन अधिकृतपणे सापडले. गंगा नदीत अधिवास करणाऱ्या या डाॅल्फिनला 'गंगेज् रिव्हर डॉल्फिन' म्हटले जाते. नेपाळ, भारत आणि बांगलादेशच्या गंगा-ब्रह्मपुत्र-मेघना आणि कर्णाफुली-सांगू नदीत त्यांचा अधिवास आहे. मात्र, गेल्या काही वर्षात या डाॅल्फिनच्या संख्या कमी झाली आहे. त्यामुळे त्यांचा समावेश संकटग्रस्त प्राण्यांच्या यादीत करण्यात आला आहे. शिवाय वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गतही त्यांना संरक्षण देण्यात आले आहे. देशातील विविध वन्यजीव संशोधन संस्था या डाॅल्फिनच्या संवर्धनाचे काम करत आहेत. मात्र, या संवर्धनाच्या कामाला गालबोट लागले आहे. उत्तरप्रदेशातील कोठारिया गावात ग्रामस्थांनी रिव्हर डाॅल्फिनला काठ्या आणि कुऱ्हाड्यांनी मारून टाकल्याची घटना उघडकीस आली आहे.

 

याबाबतचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये कोठारिया गावातून जाणाऱ्या एका कालव्यात रिव्हर डाॅल्फिन आल्याचे दिसते. त्यानंतर जमलेल्या जमावातील पाच ते सहा जण या डाॅल्फिनला काठ्या-कुऱ्हाड्यांनी मारताना दिसतात. त्यानंतर लोक या डाॅल्फिनला कालव्याच्या काठावर आणतात. त्यावेळीस या डाॅल्फिनच्या शरीरातून रक्त वाहताना दिसते. यावेळी जमावातील काही लोक तुम्ही डाॅल्फिनला मारून चूक केल्याचेही बोलताना दिसतात. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर वन्यजीव संशोधन संस्थेच्या प्रमुखांनी या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावर उत्तरपद्रेश पोलिसांनी तीघांना अटक केली आहे. रिव्हर डॉल्फिन हे फक्त गोड्या पाण्यात राहू शकतात. त्यांनी दिसत नाही. ध्वनीलहरींच्या आधारे ते मासे आणि इतर छोट्या जलचरांची ते शिकार करतात. ते वारंवार एकटे किंवा लहान गटांमध्ये आढळतात. रिव्हर डाॅल्फिनची मादी ही नरापेक्षा मोठी असते. ती दोन ते तीन वर्षांत एकदाच एका पिल्लाला जन्म देते. त्यामुळे त्यांचा जन्मदर कमी असल्याने या प्रजातीचे संरक्षण करणे गरजेचे आहे.
@@AUTHORINFO_V1@@