आता पुन्हा मिस्टर बिन दिसणे नाही ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2021
Total Views |

Mr Bean_1  H x
 
 
 
नवी दिल्ली : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खळखळून हसवणारा 'मिस्टर बिन' आता पुन्हा दिसणार नाही. अशा प्रकारचे वक्तव्य हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्यानेच केले आहे. एक अत्यंत लोकप्रिय अभिनेता, लेखक आणि निर्माता रोवन एटकिन्सन यांनी 'मिस्टर बिन'चे पात्र गेली अनेक वर्ष साकारले. आता मात्र त्यांनी ही व्यक्तिरेखा भविष्यात साकारणार नसल्याचे संकेत दिले आहेत.
 
 
 
“मिस्टर बीन साकारण्यात आता मला मजा येत नाही. ती व्यक्तीरेखा साकारण्याची जबाबदारी, मला आनंद किंवा समाधान देत नाही. मला ती व्यक्तीरेखा तणावपूर्ण आणि थकवणारी वाटते. आता त्या व्यक्तीरेखेला पूर्णविराम देण्याचा मी विचार करत आहे.” असे मत एटकिन्सन यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना व्यक्त केले आहे. वाढदिवसानिमित्त त्यांनी हे वक्तव्य केल्याने चाहते निराश झाले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@