"होर्डिंग घोटाळ्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना अभय" - मनसेचा आरोप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2021
Total Views |

sandip pachange_1 &n




मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केली पोलखोल


ठाणे: तलावांचे शहर अशी ओळख असलेल्या ठाणे शहराची ओळख अनधिकृत होर्डिंग्जचे शहर अशी होत आहे. ठाणे महापालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळे मृत व्यक्तींच्या नावे बेकायदेशीर एनओसी घेत उंचच उंच होर्डिंगचे मनोरे शहरात उभे राहत आहेत. कंत्राटदारांच्या साथीने सुरू असलेली ही गडबड मनसेने चव्हाट्यावर आणली. आणि त्यानंतर बेकायदा होर्डिंग हटवण्यात आले. मात्र महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी मोकाट असल्याने त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी सध्या मनसेकडून होत आहे.



मे.एवन इंटरप्रायजेस या कंपनीच्या ठाण्यातील परबवाडी येथील जाहिरात फलकास जाहिरात विभागाने परवानगी देताना कागदपत्रांची पडताळणी जाणीवपूर्वक योग्यरित्या केली नाही. महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानुसार श्रीनिवास गुडाब्बा हे या अनधिकृत जागेचे मालक आहेत. माञ मे- एवन इंटरप्रायजेस कंपनीने नाहरकत प्रमाणपत्र सादर करताना रामचंद्र सदाशिव परब आणि वामन सदाशिव परब यांच्या वडिलांचे २००३ साली निधन झालेले असताना मालकी दाखविण्यासाठी खोट्या सह्या केल्याचे समोर आले.


सदर प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देताच बेकायदा होर्डिंग हटवण्यात आले. तेव्हा पदाचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पाचंगे यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत असेही पाचंगे म्हणाले.



@@AUTHORINFO_V1@@