‘ती’च्या अडचणीच्या काळासाठी दिलासा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2021
Total Views |

periods room_1  




ठाण्यात प्रथमच सार्वजनिक मासिक पाळीच्या खोलींचे अनावरण



ठाणे: ठाणे महानगरपालिका आणि ‘म्यूज फाऊंडेशन’ यांनी एकत्रितपणे ठाणे शहरात पहिल्या 'मासिक पाळीच्या खोली'चे अनावरण केले. महिलांना त्यांच्या मासिक पाळीमध्ये सार्वजनिक शौचालयाचा वापर करणे अत्यंत अवघड जाते. त्यासाठी अशा स्वतंत्र मासिक पाळीच्या खोलीची संकल्पना उदयास आली. बहुधा हा भारतातील पहिलाच उपक्रम असल्याचा दावा ‘म्यूज’ संस्थेने केला असून ‘इंटरनॅशनल अससोसिएशन फॉर ह्युमन व्हॅलूस’ हे सदर कार्यक्रमाचे प्रायोजक होते.





‘म्यूज फाऊंडेशन’ने २०१९ साली ठाण्यामध्ये शाश्वत मासिक पाळीच्या उपक्रमांतर्गत मासिक पाळीबाबत एक हजार महिलांचे १५ विभागांमध्ये सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणामधून असे निष्कर्षास आले की, झोपडपट्ट्यांमध्ये राहणार्‍या महिला सार्वजनिक शौचालयावर अवलंबून असतात. शौचालयात पाणीकपात, अस्वच्छ खोल्या आणि सॅनिटरी पॅडच्या कचरा व्यवस्थापनेचा अभाव अशा प्रकारच्या समस्यांना महिलावर्गाला सामोरे जावे लागते. म्हणूनच ‘म्यूज फाऊंडेशन’ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या सौजन्याने योग्य प्रकारे विचार करून ही संकल्पना उदयास आली आहे. या संकल्पनेला ‘मासिक पाळीची खोली’ असे नाव देण्यात आले.




खोलीचा आराखडा ‘रिसायकल बिन’ नावाच्या संस्थेने बनविलेला असून सामान्य महिलेचा विचार करून सर्व सुखसोयींनी उपयुक्त अशी खोली बनविलेली आहे. ही खोली ठाण्यातील लोकमान्यनगर, पाडा क्र. 4 येथील सार्वजनिक शौचालयात बांधण्यात आलेली आहे. मासिक पाळीच्या खोलीमध्ये नळ, जेट स्प्रे, आरसा, सॅनिटरी पॅडचा निचरा होण्यासाठी कचरापेटी आहे. तसेच त्यातील कचरा हाताचा वापर न करता काढण्यासाठी खालच्या बाजूने झाकण दिलेले आहे, तसेच साबणाची बाटली, कपडे अडकविण्याकरिता खिळे आणि बाथरूमची सोयसुद्धा केलेली आहे. अशा या खोलीची रचना सुसज्ज असून झोपडपट्टीतील महिलांच्या गरजा ओळखून बनवलेली आहे. ‘म्यूज फाऊंडेशन’ने मासिक पाळीच्या खोलीबद्दल महिलांना या संवेदनशील विषयावर ज्ञान देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचे सांगितले.


@@AUTHORINFO_V1@@