राहुल गांधी यांचे समर्थन का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2021   
Total Views |

Rahul gandhi_1  
आपचे नेता राघव चड्ढांचे म्हणणे आहे की, “काँगेस हे शेतकऱ्यांसाठी दुटप्पी भूमिका घेत आहेत.” पंजाब कॉंग्रेसचे मंत्री भारत भूषण यांनी नुकतेच सांगितले आहे की, दिल्लीमध्ये शेतीसंबंधित तिन्ही कायदे लागू झाले असून, गेल्या तीन महिन्यांपासून या कायद्यांतर्गतच शेतमालाची खरेदी-विक्री होत आहे. ज्या तीन काळ्या कायद्यांसाठी पंजाबचे शेतकरी आंदोलन करत आहेत, ते तिन्ही कायदे तर पंजाबमध्ये लागू आहेत. तिथे काँग्रेसचे सरकार आहे. आता आरोप करणारे आपचे नेता असले तरी त्यांचे म्हणणे सत्य असेल, तर मग प्रश्न असा येतो की, हे शेतकरी मग पंजाबमध्ये राज्य सरकारला का जाब विचारत नाहीत? कायदे लागू करावेत, नाही करावेत किंवा त्यासंदर्भात काही सुधारण कराव्यात, यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला स्वातंत्र्य दिले आहे. तरीही तथाकथित शेतकरी शेतीची कामे सोडून, घरदार सोडून दिल्लीला का बसलेत?
 
या आंदोलनाचा बाजही ‘शाहीनबागचा पार्ट-२’ वाटतो. तसेच केंद्र सरकारच्या विरोधात धरणे देणे, तसेच मोदी आणि एकंदर बहुसंख्य हिंदू समाजाला शिव्या-शाप देणे, तसेच देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करणे. शाहीनबाग आंदोलन ज्या महिन्यात सुरू होते. त्याच काळात हेही आंदोलन सुरू असणे. शाहीनबागवाल्या बेगमांना म्हणे अल्लाताल्ला जेवण-खावण पाठवायचा (असे आंदोलनातल्या एका खातूनने सांगितलेही होते), तसेच या शेतकरी आंदोलनामध्येही खाण्यापिण्याची लयलूट आहे. आंदोलनात मोदींना शिव्याशाप देऊन थकवा आला, तर एनर्जी वाढवायला ड्रायफ्रूट लस्सी आहे. पंखे, जिम सारे काही आहे. इतकेच काय? शाहीनबागला ज्यांनी समर्थन केले, ती सारी टोळधाड या आंदोलनाला ही समर्थन करत आहे. आता याच लोकांनी शेतकरी आंदोलनाचा आणि भीमा-कोरेगावच्या नावाआड देशाचे तुकडे करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुक्ततेचा संबंध लावायला सुरुवात केली आहे. पंजाबचे शेतकरी आणि कारागृहात असलेले नक्षली समर्थक हे केंद्र सरकारच्या ब्राह्मणी बळाचे बळी आहेत, असे सांगायला यांनी सुरुवात केली आहे, तर असे हे शेतकरी आंदोलन. या शेतकरी आंदोलनाचा सगळ्यात जास्त पुळका आला आहे तो राहुल गांधी यांना. असे का असावे? की, जिथे देश अस्थिर होण्यासाठी काही घडत असते, तिथेच राहुल यांचे समर्थन का असते?
 
 
शशी थरूर यांचा प्रांत
 
 
या वेळचा प्रजासत्ताक दिनाचा सोहळाच रद्द करायला हवा, असे काँगेसचे नेते शशी थरूर यांनी म्हटले आहे आणि शशी यांच्या (वयोमानाप्रमाणे अहो जावो करावे लागते) विधानाचा संदर्भ घेऊन आता काही लोक पत्राबित्राचा घाट घालतील की, या वेळी प्रजासत्ताक दिनाचा सोहळा रद्द करावा. अर्थात, हे काही लोक म्हणजे तेच जे नेहमी काही ना काही कारणं काढून भारतात कशी असहिष्णुता आहे, असा कांगावा करतात. हा सगळा घाट कशासाठी? तर दरवर्षी प्रजासत्ताक दिनी पंतप्रधानांच्या आणि मान्यवरांच्या समक्ष मोठा उत्सव आयोजित करण्यात येतो. यावेळी म्हणे उत्तर प्रदेश सरकार प्रजासत्ताक दिनासाठी राममंदिराबाबत चित्ररथ तयार करत आहे.
 
भारत सरकारचा त्यांच्या संविधान दिनानिमित्त कार्यक्रम सगळे जग पाहणार. त्यात अयोध्येच्या राम मंदिराचा चित्ररथ असणार. मीसुद्धा ओरिजनल हिंदू आहे, असे बळेच शशी म्हणत असतात. राम मंदिराच्या चित्ररथाला समोरून विरोध करता येत नाही, त्यामुळे त्यांनी कोरोनाचा बहाणा करून प्रजासत्ताक दिनाचा उत्सव रद्द करण्याची मागणी तर केली नाही ना? अयोध्येचे राम मंदिर हे भारताचेच नव्हे, तर मानवी मूल्यांचा आदर करणाऱ्या जगभरातील प्रत्येक व्यक्तीचे आहे. अयोध्या राम मंदिराचा हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास जगजाहीर आहे. त्याबाबत कुणी काय काय भूमिका घेतली, याबद्दलही सगळ्यांनाच माहिती आहे. आपणच मोठे निधर्मी, असा आव आणत कितीतरी काँग्रेसी सेक्युलर नेत्यांनी तसेच इतर जातीयवादी पक्षांनी राम मंदिरउभारणीला आक्षेपच घेतला. पण, या सगळ्यांना पुरून उरत राम मंदिराच्या बाजूनेच निकाल लागला. ज्यांना ‘हिंदू’ या शब्दाचीच अ‍ॅलर्जी आहे, त्यांचे मात्र या निर्णयामुळे पार अवसान गळले. राम मंदिराचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनी सगळे जग पाहणार म्हणूनच शशी यांना प्रजासत्ताक दिनाचा सोहळा नको आहे, असे प्रथमदर्शनी तरी वाटते. खरे तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाचे स्वरूपही सीमित ठेवले आहे. गर्दी आणि संसर्ग टाळण्यासाठी विशेष काळजी घेतली आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे प्रजासत्ताक दिनाचा सोहळा होणारच आणि त्यात राम मंदिर अयोध्येचा चित्ररथ असणारच. तूर्तास शशी हा तुमचा प्रांत नाही, तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंड्स मोजत बसा.
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@