राज्यात दुसऱ्यांदाच आढळला हा दुर्मीळ प्राणी; धुळ्यात जीवदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2021
Total Views |

hedgehog_1  H x

जखमी प्राण्यावर उपचार 


मुंबई (प्रतिनिधी) - धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील शिवारात 'हेजहाॅग' हा दुर्मीळ प्राणी जखमी अवस्थेत आढळून आला होता. चार दिवसांच्या उपचाराअंती या प्राण्याची वन विभागाने नैसर्गिक अधिवासात सुटका केली. महाराष्ट्रात 'हेजहाॅग' सापडल्याची ही दुसरी घटना आहे.



परदेशी पाळीव प्राण्याच्या व्यापाराअंतर्गत भारतामध्ये परदेशात आढळणाऱ्या हेजहाॅग प्रजातींना मोठी मागणी. परदेशात आढळणाऱ्या काही 'हेजहाॅग'च्या प्रजाती या आपल्याकडे पाळल्या जातात. भारतामध्ये प्रामुख्याने मध्य भारतात लाॅगईअर्ड हेजहाॅग आणि पाले हेजहाॅग या दोन प्रजाती आढळतात. आकाराने माणसाच्या तळाएवढा असणाऱ्या या प्राण्याचे वजन ५०० ते ७०० ग्रॅम असते. पाली, छोटे सरडे, लहान साप, गांडूळ इत्यादीवर तो उपजीविका करतो. आकारने लहान आणि त्याचा रंग मातीशी मिळताजुळता असल्याने तो सहसा नजरेस पडत नाही. 
 
 

काही दिवासांपूर्वी धुळ्यातील आढे शिवारातील धनंजय मराठे यांना शेतात हेजहाॅग आढळून आला. प्रथमदर्शनी त्यांना हा प्राणी साळिंदराचे पिल्लू असल्याने त्यांनी यासंबंधीची माहिती तालुक्याचे पशुवैद्यकीय अधिकारी उमेश बारी यांन दिली. बारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता ते साळिंदर पिल्लू नसून हेजहाॅग असल्याचे निदर्शनास आहे. त्यानंतर अनेर डॅमचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप रौंदळ, नचेर कन्झर्वेशन फोरमचे अभिजित पाटील घटनास्थळी पोहोचले. हा हेजहाॅग अशक्त असल्याने त्यांच्या देखभालीची जबाबदारी नचेर कन्झर्वेशन फोरमकडे देण्यात आली. चार दिवसांनी प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर हेजहाॅगला वनाधिकाऱ्यांच्या उपस्थित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. हेजहाॅग सापडल्याची ही राज्यातील दुसरी घटना आहे. काही वर्षांपूर्वी हा प्राणी अमित सय्यद यांना नंदुरबार जिल्ह्यात आढळला होता. 

 


@@AUTHORINFO_V1@@