'मुंबई मा जलेबी ना फाफडा, 'जनाब'सेने'ला आपटा

    05-Jan-2021
Total Views |

atul bhatkhalkar_1 &


मुंबई :
गुजराती बांधवांना आकर्षित करण्यासाठी ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ शिवसेनेकडून अशा टॅगलाईनचा वापर करण्यात आला आहे. यावरून भाजपने शिवसेनेवर जोरदार निशाणा लगावला आहे. 'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा; मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेची गुजराती मतदारांना साद... शिवसेनेने साद घातली असली तरी गुजराती मतदारानं मनात ठाम ठरवलं आहे "मुंबई मा जलेबी ना फाफडा, 'जनाबसेने'ला आपटा," असं म्हणत भातखळकर यांनी शिवसेनेवर टीकेचा बाण सोडला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केली.


शिवसेनेची गुजराती मतदारांना साद


फेब्रुवारी २०२२ मध्ये होणारी मुंबईसह दहा महापालिकांची निवडणूक अत्यंत वेगळ्या परिस्थितीत होणार आहे. भाजप जनता पक्षाच्या हातातील सत्ता भाजपच्या हटवादी गुजराी नेतृत्त्वामुळे आणि मराठी नेतृत्त्वाला संधी न देण्याच्या संकुचित मनोवृत्तीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिरावून घेतली असल्याने भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली मी मुंबईकर ही प्रतिमा जपत अत्यंत साधेपणाने महाराष्ट्रातील सर्व धर्म समभाव जपत उत्कृष्ट काम करत संकटावर मात करत मुंबई, महाराष्ट्र कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यात यश मिळवले. हे न पाहावल्यामुळे भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत आणि मुंबई महापालिकेवरचा भगवा झेंडा खाली खेचण्याच्या वल्गना करत आहेत. शिवसेनेच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांनी रविवारी १० जानेवारी २०२१ रोजी मुंबईमधील गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित केला आहे. मुंबईमधील गुजराती मतदारांना जागृत करण्यासाठी रविवारी १० जानेवारी २०२१ रोजी सकाळी दहा वाजता नवनीत हॉल, गुजराती समाज भवन, लोटस पेट्रोल पंपसमोर, ओशिवरा जोगेश्वरी लिंक रोड, जोगेश्वरी (पश्चिम) इथे हा मोळावा आयोजित करण्यात आला आहे. कोरोना संकटाच्या वातावरणात सर्व नियामंचे पालन करण्यात येणार असून प्रथम येणाऱ्या शंभर लोकांना सभागृहात प्रवेश देण्यात येणार आहे. या परिसरातील शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांनी केले आहे.