अनर्थ टळला ; साईराज ट्रॅव्हलची बस भर रस्त्यात पेटली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2021
Total Views |

Thane_1  H x W:
 
ठाणे : शिर्डी ते बोरिवली या मार्गावर धावणारी साईराज ट्रॅव्हलर्सच्या बसने पूर्वद्रुतगती महामार्गावर ठाण्यातील ज्युपीटर रुग्णालयानजीक अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. बसमधील २८ प्रवाशांचा आकांत झाला. या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र वाहतुकीचा चक्काजाम झाला होता. साई राज ट्रॅव्हलर्स कंपनीची बस हि राजू बावके यांच्या मालकीची असून त्यावर चालक नदीम पटेल हे काम करतात. सदरची बस हि शिर्डी ते बोरिवली या मार्गावर चालते. शिर्डीहून आलेली टुयुरिस्ट बस ठाण्यात दाखल झाली तेव्हा २८ प्रवासी प्रवास करीत होते. ट्युरिस्ट बस ठाण्याच्या महामार्गावरन बोरिवलीकडे जात होती. बस महामार्गावर ज्युपिटर हॉस्पिटलच्या विरुद्ध बाजूस आली असता तिने अचानक पेट घेतला. चालक पटेल यांनी प्रसंगवधानाने बस थांबवून बस चालक आणि स्थानिक नागरिकांनी प्रवाशांना वाचविण्याचे काम केले. या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.
 
 
 
दरम्यान घटनेची माहिती मिळताच वाहतूक कोंडीतून वाट काढीत स्थानिक पोलीस ,ठाणे महापालिका अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी पोहचली. त्यांनी २ फायर इंजिनच्या सहाय्याने नियंत्रण मिळवले आणि तब्बल २८ प्रवाशांचा जीव वाचविला. अन्यथा नव्या वर्षाच्या पाहिल्याच आठवड्यात भीषण दुर्घटना घडली असती. अनर्थ टळला. बसमधील इंजिनच्या वायरच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज बस चालक पटेल यांनी वर्तविला. तर आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
 
 
वाहतुकीचा चक्काजाम, वाहनाच्या लागल्या रांगा
 
 
अचानक महामार्गावरच धावत्या बसने पेट घेतल्याने भर रस्त्यात बस उभीकरून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचे कार्य स्थानिक नागरिक आणि वाहन चालकाने केले. तेव्हा पेटलेल्या बसला बघण्यासाठी बघ्याची गर्दी झाली होती. तर वाहतुकीचा चक्कच जाम झालेला होता. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही वेळाने वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
 
 
@@AUTHORINFO_V1@@