कपिल शर्माचा नेटफ्लिक्स अवतार !

    05-Jan-2021
Total Views | 102

kapil sharma_1  




अफवांवर विश्वास न ठेवण्याचे चाहत्यांना आवाहन




मुंबई: "अफवांवर विश्वास ठेऊ नका, फक्त माझ्यावर ठेवा" असे आपल्या चाहत्यांना आवाहन करत विनोदी अभिनेता कपिल शर्मा याने आपली 'नेटफ्लिक्स एंट्री' घोषित केली. गेले अनेक दिवस छोट्या पडद्यावर दिसणारा कपिल शर्मा आता नेटफ्लिक्सवर येणार म्हटल्यावर तर चाहत्यांच्या आनंदाला उधाणच आले आहे. कपिलच्या या नव्या प्रवासाला चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

 
नेहमीप्रमाणे यावेळीही अगदी विनोदी पद्धतीनेच घोषणा केली. कपिल शर्मा आणि त्याची इंग्रजी भाषा हा कायमच चर्चेचा आणि विनोदाचा भाग झालेला आहे. त्यामुळे कपिल शर्माने तो नेटफ्लिक्सवर येत असल्याची बातमी इंग्रजी भाषेत बोलताना अडखळत आणि विनोद करतच दिली.





"आता मी तुमच्या मोबाईल, लॅपटॉप वर येतोय"असं म्हणत कपिलने स्वतःच त्याच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. त्यामुळे इतकी वर्ष आपल्या अफाट विनोदबुद्धीने सगळ्यांना पोट धरून हसायला लावणारा कपिल आता प्रेक्षकांसाठी काय मेजवानी घेऊन येतोय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121