झिवा धोनीची जाहिरात क्षेत्रात एंट्री !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2021
Total Views |

Ziva Dhoni_1  H
मुंबई : मागील वर्षी भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र, अद्यापही त्याच्या ब्रँड व्हॅल्यूची किमंत जाहिरात क्षेत्रात अधिक आहे. आता त्याची मुलगी झिवादेखील जाहिरात क्षेत्रात उतरली असून खुद्द माहीसोबत ती झळकणार आहे. या संदर्भातील एक व्हिडियो नुकताच प्रदर्शित करण्यात आला. एका ख्यातनाम उत्पादनासाठी हे दोघेही जाहिरात करत आहेत.
 
 
 
 
झिवा महेंद्रसिंग धोनी ही अवघ्या ५ वर्षाची असून सोशल मिडियावर तिचा एक वेगळा चाहता वर्गही आहे. इन्स्टाग्रामवर तिचे १.८ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. आता नव्या वर्षात ती जाहिरात क्षेत्रात पदार्पण करत आहे. ओरियो या चॉकलेट क्रिम बिस्कीटच्या जाहिरातीत धोनी आणि झिवा एकत्र दिसत आहेत. त्यामुळे आता आणखी एका स्टार किड्सची एंट्री झाली आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@