सकारात्मकता वसे मनी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2021
Total Views |

positivity_1  H
 
 
 
 
आजूबाजूची परिस्थिती कितीही खडतर असू दे, तरीही नेहमी चांगल्या परिणामांचाच विचार करावा व अवघड गोष्टींचा कसोशीने सामना करावा. (छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे चरित्र हे याचे उत्तम उदाहरण होय.) आपल्या आयुष्याचा व निर्णयाचा ताबा सर्वस्वी आपण घेऊन मग त्यावर कृती करावी.
 
मनाची सकारात्मकता जशी वाढीला लागते, तशी मग शरीरातील अंतर्गत परिस्थितीही बदलत जाते. मनाच्या सकारात्मकतेमुळे शरीरातील स्राव, संप्रेरके व सर्व अवयवांच्या कार्यामध्ये कमालीची सुसूत्रता येते व यामुळे शरीर, मन व चैतन्यशक्ती सशक्त बनते. परंतु, नुसते सकारात्मक विचार करुन भागत नसते, तर सकारात्मक विचारांना सकारात्मक कार्याची जोड देणे आवश्यक असते. यातून मग शरीर समतोल राहते. (Harmony of mind body and vital energy) शेवटी आजार होणे म्हणजे काय? तर सकारात्मक आणि रोगकारक ऊर्जेमधील संघर्षात जेव्हा शरीर व मन चैतन्यशक्ती कमी पडते, तेव्हा आजार होतो.
 
 
कुठल्याही जंतू, विषाणू किंवा जीवाणू जेव्हा शरीरात प्रवेश करतो, त्यावेळी तो संसर्गाकरिता त्याची अंतर्गत ऊर्जाच वापरत असतो आणि माणूस त्याच्या संरक्षणाकरिताही अंतर्गत ऊर्जाच वापरत असतो. ही ऊर्जा असते, पण दिसत नाही, अदृश्य असते. परंतु, ती असते. यालाच डॉ. हॅनेमान यांनी 'Dynamic' असे म्हटले आहे आणि आजार होण्यामागे या ऊर्जेचा जो वापर असतो, त्यामुळे आजारसुद्धा 'Dynamic' असतात. म्हणजेच काय तर शारीरिक ऊर्जा व रोगकारक ऊर्जा यांच्यावरच हा खेळ चालत असतो आणि आपल्याला निरोगी राहायचे असल्यास आपल्याला शारीरिक ऊर्जा ही मजबूत करणे गरजेचे असते. ही ऊर्जा मजबूत करणे गरजेचे असते. ही ऊर्जा 'Dynamic' असते व शरीरातील एकच अदृश्य अवयव जोसुद्धा 'Dynamic' आहे तोच शरीरातील या 'Dynamic' ऊर्जेला मजबूत करु शकतो आणि तो म्हणजे मन. म्हणूनच मानवशास्त्रात प्रथम लिहिलेले आहे की, 'माईंड इज अ की टू मॅन.' मनाच्या सकारात्मकतेसाठी आपण खालील गोष्टी आचरणात आणू शकतो.
 
 
आजूबाजूची परिस्थिती कितीही खडतर असू दे, तरीही नेहमी चांगल्या परिणामांचाच विचार करावा व अवघड गोष्टींचा कसोशीने सामना करावा. (छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे चरित्र हे याचे उत्तम उदाहरण होय.) आपल्या आयुष्याचा व निर्णयाचा ताबा सर्वस्वी आपण घेऊन मग त्यावर कृती करावी. सत्य जरी कटू असले व कधीकधी दुखावणारे असले तरी ते तात्पुरते दुखावते, पण खोटारडेपणा व लबाडी कायमची मने दुखावतात, म्हणून नेहमी व्यक्त व्हायला शिका. पारदर्शकता ठेवा व पाहा परस्पर संबंध कसे सुधारतात ते. विनोदबुद्धी जागृत ठेवा. हसायला व हसवायला शिका. याने कुठल्याही कठीण प्रसंगातूनही मार्ग निघतो. (पु. ल. देशपांडे यांचे वाङ्मय हे याचे उत्तम उदाहरण आहे.) दुसऱ्यांबद्दल प्रेम व आदरभावना ठेवा.
 
 
सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतरांच्या वागण्यामुळे तुमच्या अंतर्मनातील शांतता ढळू देऊ नका. कुठल्याही कामात तुमच्या कामावर निष्ठा ठेवा व कार्य करताना सबुरी बाळगा. कुठलाही 'रिझल्ट' एका रात्रीत येत नाही. आपल्या मनातील शांतता जर ढळू लागली तर आपोआप आपल्या 'Dynamic Energy' एक प्रकारची पोकळी निर्माण होते व ही पोकळी जर नकारात्मक किंवा रोगकारक ऊर्जेने व्यापली, तर मात्र मग माणूस आजारी पडतो. सकारात्मकतेसाठी आणखी कोणते उपाय करता येतात ते आपण आता पुढे पाहूया.
 
 
- डॉ. मंदार पाटकर
(लेखक एम.डी होमियोपॅथी आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@