वरळी सी-फेस येथे सिग्नल यंत्रणेला चमकता साज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2021
Total Views |

new traffic signal in mum

'ही' आहेत ५ ठळक वैशिष्ट्ये



मुंबई: दादर येथे ऑगस्टमध्ये सिग्नल यंत्रणेत स्त्री-पुरुष समानतेचा प्रयोग सुरू झाल्यानंतर आता वरळी सी-फेसमधील सिग्नल यंत्रणेला ‘युनिडायरेक्टरल ट्राफिक लाईट’चा नवा चमकता साज चढवला गेला आहे. यामुळे वाहतूक यंत्रणा अधिक सुरक्षित होणार असून, मुंबईच्या सौंदर्यातही भर पडणार आहे.
वाहतूक विभाग आणि खासगी संस्थेची मदत घेत वरळी सी-फेस येथे प्रायोगिक तत्त्वावर १ जानेवारीपासून ‘युनिडायरेक्टरल ट्राफिक लाईट’ बसवण्यात आले आहेत. सिग्नल यंत्रणेला ‘युनिडायरेक्टरल ट्राफिक लाईट’मध्ये रूपांतरित करण्यासाठी पालिकेच्या अभियंत्यांनी जीवापाड मेहनत घेत ही किचकट प्रक्रिया पूर्ण केली आहे. यात एलएडी लाईटचा वापर केला जाणार असून वीजपुरवठा नियंत्रित राहण्यावर भर देण्यात आला आहे. वरळीबरोबर हाजी अली, प्रिन्सस्टेट स्ट्रीट तसेच इतर भागात अशा पद्धतीची प्रकाशयोजना केली जाणार आहे.

‘युनिडायरेक्टरल ट्राफिक’ची वैशिष्ट्ये:

१.युनिडायरेक्टरल ट्राफिक लाईट’मुळे दोन्ही दिशांनी येणार्‍या वाहनचालकांना अगदी लांबून सिग्नल दिसू शकेल.

२.लांबून सिग्नल दिसल्यामुळे दोन्ही दिशांनी येणाऱ्या वाहनांचा वेग आधीच कमी करणे शक्य होईल.

३.पादचार्‍यांनाही सिग्नल लांबून दिसल्यामुळे रस्ता ओलांडणे सोपे होईल.

४.रात्रीच्या वेळी ही यंत्रणा अधिक ठळकपणे दिसल्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होणार आहे.

५.ऊन, पाऊस, सोसाट्याचा वारा यांच्या मार्‍यातही ‘युनिडायरेक्टरल ट्राफिक’ खांब टिकून राहणार आहेत.




@@AUTHORINFO_V1@@