‘पॉलिसी मेकिंग’ हा महत्त्वाचा घटक : देवेंद्र फडणवीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2021
Total Views |

PARC_1  H x W:
 
 
 
मुंबई : “कुठल्याही गव्हर्नंसमध्ये जोपर्यंत ‘पॉलिसी’ ही ‘इक्विटी’ आणि ‘ट्रान्स्फरन्सी’ अशा सगळ्या साचातून जात नाही, तोपर्यंत ती ‘पॉलिसी’ ही सर्वंकष होऊ शकत नाही किंवा जे काही आपल्याला ध्येय साध्य करायचे आहे, त्याचे ‘इन्स्ट्रूमेंट’ ही ‘पॉलिसी’ आहे. त्यामुळे ‘पॉलिसी मेकिंग’ हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे,” असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. ४ जानेवारी रोजी केले.
 
 
 
विविध विषयांवर सखोल संशोधन करून विशेष अहवाल तयार करणाऱ्या ‘विवेक व्यासपीठ’ संचलित ‘पॉलिसी अॅडव्होकसी रिसर्च सेंटर’च्या (पार्क) कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘भारतीय विचार दर्शन’चे अध्यक्ष सुश्रुत चितळे, ‘भारतीय विचार दर्शन’चे कार्यवाह राहुल पाठारे, ‘भारतीय विचार दर्शन’चे सदस्य आणि ‘एसएफसी एनव्हायरमेंटल प्रा. लि.’चे एम. डी संदीप आसोलकर, ‘हिंदुस्थान प्रकाशन’ संस्थेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखक, विचारवंत रमेश पतंगे, दै. ‘मुंबई तरुण भारत’चे प्रबंध संपादक आणि ‘पार्क’चे संस्थापक-संचालक दिलीप करंबेळकर, दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक आणि ‘पार्क’चे संचालक किरण शेलार, दै. ‘मुंबई तरुण भारत’चे व्यवसाय प्रमुख रविराज बावडेकर, ‘एस्सेल’ समूहाचे अशोक गोयल, ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’चे एम.डी. आशिष चौहान, ‘कॉसमॉस’ समूहाचे एम.डी. आणि ‘लघु उद्योग भारती’चे प्रदेश कार्यवाह भूषण मर्दे, ‘अक्वाकेम एनविरो इंजिनिअर्स प्रा.लि.’चे चेअरमन मधुकरराव नाईक, कल्याण येथील टॅक्स कन्सल्टंट सचिन हेजिब, ‘वॉटरफिल्ड टेक्नोलॉजिस प्रा. लि.’चे संस्थापक संदीप अध्यापक, ‘बायोमॅक्स रेबिडीज’चे संस्थापक डॉ. अरुण कुलकर्णी, अर्थतज्ज्ञ संजय पानसे, ‘जीआयसी’चे ‘सीएसआर’ हेड नामदेव कदम, लीगल अॅडव्हायझर राजीव पांडे, व्यावसायिक अनिल गुप्ता, ‘विवॉल्व प्रोजेक्ट्स प्रा. लि.’चे प्रमोटर-डायरेक्टर चंद्रेश शाह, ‘एनव्हायरमेंट बिझनेस अॅट यूपीएल’चे व्हाईस प्रेसिडेंट एस. बालासुब्रमण्यम आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 
 
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पॉलिसी अॅडव्होकसी रिसर्च सेंटरचे (पार्क) काम पाहून मला खरोखर अतिशय मनापासून आनंद झाला. मला असे वाटते की, ‘पॉलिसी मेकिंग’ हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. कुठल्याही गव्हर्नंसमध्ये जोपर्यंत ‘पॉलिसी इक्विटी’ आणि ‘ट्रान्स्फरन्सी’ अशा सगळ्या साचातून जात नाही, तोपर्यंत ती पॉलिसीही सर्वंकष होऊ शकत नाही किंवा ज्या काही उद्दिष्टांची पूर्ती करायची आहे, त्याची ‘इन्स्ट्रूमेंट’ ही पॉलिसी आहे. गेल्या काही वर्षांत आपण सर्व जण ‘स्टेक होल्डर्स’चा विचार करायला लागलो आहोत. यापूर्वी लोकशाही व्यवस्थेमध्ये आधी आयएएस अधिकाऱ्याला वाटायचे ती ‘पॉलिसी’ असायची. अशा प्रकारच्या ‘पॉलिसी’मध्ये लोकांना काय वाटते, याचा विचार केला जात नसायचा. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्याचा लाभ होणार की नाही, याचा विचार केला जात नसे. त्यामुळे अशा प्रकारच्या ‘पॉलिसी’ या सर्व अपयशी होत्या. महात्मा गांधी यांचे एक वाक्य मला आठवते की, ‘तुम्ही समाजातल्या प्रत्येक गरिबांतल्या गरिबावर काय परिणाम होईल, याचा विचार करा आणि मग ‘पॉलिसी’ बनवा. त्याचा समाजावर ‘पॉझिटिव्ह’ परिणाम होत असेल तर ती यशस्वी आहे, असे समजा,’ असे त्यांनी सांगितले होते.
 
 
आपण सर्व लोकशाही व्यवस्थेत आहोत. या व्यवस्थेत सर्व विचारांना एकत्र करून ‘पॉलिसी’ बनविणे हे महत्त्वाचे आहे. आपण गेल्या काही वर्षांमध्ये असे पाहतो आहोत की, ‘पॉलिसी अॅडव्होकसी’मध्ये खूप ‘अल्ट्रा लेफ्ट’ विचार अधिक आलेला दिसतो. ‘लेफ्ट’ आणि ‘राईट’ हा विषय नाही. आपल्याला सर्व हाणूनच पाडायचे आहे. हे सर्व काही चुकीचेच आहे, अशा व्यवस्था नकोच, अशा प्रकारच्या विचारांनी जेव्हा ‘पॉलिसी अॅडव्होकसी’ होते, तेव्हा अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांनाही कारण नसताना विरोध होतो. यामुळे वातावरण गढूळ होते. विकासकामांमध्ये आडकाठी निर्माण होते. त्यामुळे हे सर्व थांबविण्यासाठी पारदर्शक संशोधन करणाऱ्या संशोधन केंद्रांची गरज होती आणि ‘पार्क’च्या माध्यमातून ही उणीव भरून निघेल,” अशी आशा फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@