१४ गावांना प्रतिक्षा मुख्यमंत्र्याच्या भेटीची

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2021
Total Views |

KDMC_1  H x W:
डोंबिवली : ग्रामपंचायतीनी १४ गावांचा ठराव करून त्यांना नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. नवी मुंबई महापालिकेचाही अशासकीय ठराव आहे. मग तरी ही गावे महापालिकेत समाविष्ट केली जात नाही. ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी राज्य सरकार दरबारी लावून धरणार असून त्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली जाणार आहे. सर्व पक्षीय विकास समितीला आता मुख्यमंत्र्याच्या भेटीची प्रतिक्षा आहे.
 
 
१४ गावांमध्ये विकास झाला नसल्याने सर्व पक्षीय विकास समितीने निवडणूकीवर बहिष्कार टाकला आहे. समितीने निवडणूकीवर तिसऱ्यांदा बहिष्कार टाकला असून तो यशस्वी झाला आहे. या पाश्र्वभूमीवर दहिसर येथे काशी विश्र्वेश्र्वर मंदिरात १४ गावांची एक बैठक पार पडली. या बैठकीला भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष ओबीसी सेलचे व सर्व पक्षीय समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, आमदार राजू पाटील, मोतीराम गोंधळे, पाडुंरग वालिलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 
"१४ गावे यापूर्वी नवी मुंबई महापालिकेत होती. ही गावे पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी पुन्हा एकदा सर्व पक्षीय विकास समितीच्यावतीने पुन्हा एकदा करण्यात आली आहे. या मागणीला राजू पाटील यांनी पांठिबा दिला आहे. १४ गावांचा विकास व्हावा यासाठी आमची धडपड सुरू आहे" असे लक्ष्मण पाटील यांनी सांगितले.
 
 
मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले की, "कल्याण-डोंबिवलीत २७ गावे समाविष्ट करण्याचा ठराव नव्हता. तरीही ही गावे कल्याण-डोंबिवलीत समाविष्ट करण्यात आली आहे. १४ गावच्या ग्रामपंचायतीनी ठराव करून त्यांना नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायतीने ठराव करून ही गावे नवी मुंबईत समाविष्ट करायला विलंब का होत आहे? काही चुका झाल्या असतील तर आम्ही मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आणून देणार आहोत. पालकमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री असल्याने त्यांच्याकडे या विषयाचा पाठपुरावा करून ही गावे नवी मुंबईत समाविष्ट करून घेण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे."
 
 
@@AUTHORINFO_V1@@