चीनच्या थयथयाटाचे कारण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jan-2021   
Total Views |

indo china_1  H


भारताने बांगलादेशाला २० लाख व्हॅक्सिन डोस पुरवले. त्यामुळे बांगलादेशाने चीनला त्यांच्याकडून पुरवल्या जाणार्‍या व्हॅक्सिनसाठी नकार दिला. आता चीनचे म्हणणे आहे की, भारताने बांगलादेशला व्हॅक्सिन दिले म्हणून बांगलादेशने चीनला व चीनचे ‘सिनोव्हॅक व्हॅक्सिन’ घेण्यास नकार दिला.


भारतामुळे आमचे नुकसान झाले, असा थयथयाट सध्या चीन करत आहे. कारण, चीनने बांगलादेशला कोरोनाशी लढणारे ‘सिनोव्हॅक व्हॅक्सिन’ द्यायचे कबूल केले होते. मात्र, चीनने अट टाकली होती की, हे व्हॅक्सिन बनवण्याचा खर्च बांगलादेशाने करावा. जुलै २०२०पासून म्हणे चीन आणि बांगलादेशच्या यासंदर्भात वाटाघाटी सुरू होत्या. मात्र, भारताने कोरोनाशी लढणारी ‘कोव्हॅक्सिन’ आणि ‘कोव्हिशिल्ड’ तयार केली. इतकेच नव्हे, तर शेजारधर्म पाळत मोठ्या भावाच्या नात्याने या व्हॅक्सिन आजूबाजूच्या राष्ट्रांना पुरवल्या. हे सगळे करताना या राष्ट्रांना व्हॅक्सिन बनवायचा खर्च उचला, असे सांगितले नव्हते. याच पार्श्वभूमीवर भारताने बांगलादेशाला २० लाख व्हॅक्सिन डोस पुरवले. त्यामुळे बांगलादेशाने चीनला त्यांच्याकडून पुरवल्या जाणार्‍या व्हॅक्सिनसाठी नकार दिला. आता चीनचे म्हणणे आहे की, भारताने बांगलादेशला व्हॅक्सिन दिले म्हणून बांगलादेशने चीनला व चीनचे ‘सिनोव्हॅक व्हॅक्सिन’ घेण्यास नकार दिला.


चीनच्या वृत्तपत्रातून आणि इतर माध्यमातून या विषयाला धरून भारतावर आगपाखड केली जात आहे. मात्र, याच वेळी भारत नुसता आत्मनिर्भरच नव्हे, तर जगद्गुरू बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, हे सिद्ध होत आहे. आजपर्यंत अमेरिका किंवा चीन हे जगात दात्याच्या रूपात होते. मात्र, आज भारत या दोन्ही देशांना मागे सारत मार्गक्रमण करत आहे. भारताने आजूबाजूच्या देशांना किती व्हॅक्सिन पुरवल्या याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी माहिती दिली आहे. ते म्हणतात की, २० जानेवारी, २०२१नंतर भारताने भूतान (१.५लाख), मालदीव (एक लाख), नेपाळ (दहा लाख), बांगलादेश (२० लाख), म्यानमार (१५ लाख) मॉरिशस (एक लाख), सेशेल्स (५० हजार), श्रीलंका (पाच लाख) आणि बहरीन (एक लाख) असे व्हॅक्सिन पुरवले आहेत. तसेच पुढील काही दिवसांत ओमान (एक लाख), करिकॉम (पाच लाख), निकारागुआ (दोन लाख) आणि प्रशांत द्वीप (दोन लाख) व्हॅक्सिन पुरवणार आहे. शेजारच्या सर्वच देशांना भारत मदत करत आहे. कोरोनाविरुद्ध लढायला साथ देत आहे. मात्र, त्याचवेळी पाकिस्तानला ही मदत का केली नाही? तर भारतीय प्रशासनाने स्पष्ट केले की, वरील सर्व देशांनी भारताकडे व्हॅक्सिनची मागणी केली होती. पण, पाकिस्तान हा भारताचा भूतकाळातील भाग असूनही पाकिस्तानने भारताकडे याबाबत मदत मागितली नाही.

असो, पाकिस्तान भारताकडे मदत तरी कोणत्या तोंडाने मागणार? कारण पाकिस्तानच्या मनात भारताबद्दल सदा न कदा द्वेष भरलेला आहे. भारताला त्रास देण्याचा नेहमीच अयशस्वी प्रयत्न पाकिस्तान करतो. या असल्या परिक्षेपात पाकिस्तान काय म्हणून भारताकडे मदत मागेल? जर पाकिस्तानने मदत मागितली तर भारत पाकिस्तानलाही मदत करेल. मग नेहमीच भारताची बरोबरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या पाकिस्तानला जगाच्या समोर मानावेच लागेल की बाप बापच असतो. नेमके हेच पाकिस्तानला नको आहे. तसेच पाकिस्तानच्या प्रशासनाला आणि राजकारण्यांना पाकिस्तानी जनतेला भारताबद्दल कोणत्याही प्रकारचा स्नेह निर्माण होऊ नये असेच वाटते. जर भारताने व्हॅक्सिन दिले तर पाकिस्तानी जनतेमध्ये भारताची प्रतिमा उंचावेल, असेही त्यांना वाटत असते. त्यामुळे पाकिस्तानने भारताकडून व्हॅक्सिनची मदत मागवली नाही. दुसरीकडे चीनने २१ कोटी लोकसंख्या असलेल्या पाकिस्तानला केवळ पाच लाख व्हॅक्सिनची मदत जाहीर केली. तेही पाकिस्तानने स्वखर्चाने ते व्हॅक्सिन चीनमधून घेऊन जावे, असेही सांगितले. याचवेळी पाकिस्तानपेक्षा लोकसंख्येने खूपच कमी असलेल्या नेपाळला मात्र भारताने दहा लाख व्हॅक्सिन पुरवले. याचा परिणाम असा झाला की,चीनची व्हॅक्सिनबाबतची मक्तेदारी संपुष्टात आली. जग चीनच्या कोरोनाविरोधातल्या व्हॅक्सिनपेक्षा भारतावर जास्त विश्वास ठेवत आहे. तसेही मागे एक बातमी प्रसिद्ध झाली होती की, चीनने पाकिस्तानला काही लाख मास्क वाटले. पण नंतर कळले की ते मास्क वापरलेल्या अंतरवस्त्रांपासून बनवले होते. सोशल मीडियावर ही बातमी भरपूर चालली. खरे-खोटे देव जाणे. पण, त्यामुळेही चीनवर कुणीही भरवसा ठेवायला तयार नाही. कपटी आणि विश्वासघातकी आणि संधिसाधू चीनला जगभरातून समर्थन नष्ट होत आहे. चीनच्या थयथयाटाचे हेच कारण आहे.

@@AUTHORINFO_V1@@