रत्नशास्त्रात करिअरच्या संधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2021
Total Views |

gems_1  H x W:
 
 
 
एक रत्न हा नैसर्गिकरीत्या आढळत असून तो कापून आणि पॉलिश करून दागिने किंवा इतर सौंदर्यशास्त्रीय वस्तू बनवण्यासाठी वापरला जातो. मात्र, अनेक मौल्यवान दगड किंवा खडे हे पृथ्वीच्या गर्भात तयार झालेली खनिजे आहेत. काही दगड (लॅपिस लाझुली) आणि सेंद्रिय साहित्य (अंबर, मोती आणि कोरल) हेही खडे मानले जातात. दुर्मीळता, सौंदर्य (चमक), स्वीकारार्हता आणि टिकाऊपणा हे काही महत्त्वाचे निकष आहेत, जे एक खनिजाचा खडा, दगड आणि ऑर्गेनिक साहित्याला रत्न बनवतात. ‘जेमोलॉजी’ ही खनिजशास्त्रीय आणि इतर निकषांचा वापर करून खड्यांचा अभ्यास करण्याची कला आहे आणि एक रत्नशास्त्रज्ञ ही एक कौशल्य असलेली व्यक्ती आहे, जी खड्यांची ओळख आणि त्यांची व्याख्या त्यांचे गुणधर्म, ‘प्लेओक्रोइझम रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स’, प्रसरण, विशिष्ट घनता, टणकपणा, खोली, खाचा आणि चमक यांच्यावर आधारित राहून करतात.
 
 
 
 
अनंतकाळापासून जगभरात खडे आणि रत्ने ही प्रेम, प्रतिष्ठा, सत्ता, भरभराट आणि मानसन्मान यांची चिन्हे म्हणून ओळखली जातात. काही मौल्यवान खडे जसे हिरे, नीलम (निळा, पांढरा आणि पिवळा), पाचू आणि माणिक यांनी शाही तसेच सामान्य लोकांना आकर्षित केले आहे आणि इतिहासात आपले स्थान निश्चित केले आहे. सुरत, जयपूर, मुंबई, अहमदाबाद आणि दिल्ली यांसारखी काही भारतीय शहरे हिरे आणि इतर मौल्यवान रत्नांसाठी सर्वोत्तम साधनसुविधा व कारागिरी कौशल्यांसाठी ओळखली जातात आणि देशातील सर्वाधिक परकीय चलन कमावणार्‍या विभागांपैकी ती आहेत. अशा परिस्थितीत ‘जेमोलॉजिस्ट’चे प्रमुख काम हे विविध रत्नांची योग्य ओळख, ग्रेडिंग आणि मूल्यमापन त्यांच्या विविध गुणधर्मांवर आधारित राहून करण्याचे असते. त्यात नैसर्गिक रत्नांना त्यांच्या सिंथेटिक, प्रक्रिया केलेल्या आणि/किंवा नैसर्गिक सिम्युलंट घटकांपासून वेगळे करण्याच्या प्रक्रियेचाही समावेश होतो. विविध औद्योगिक क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर करियरच्या संधी उपलब्ध आहेत. त्यात रत्ने कापणे, पॉलिशिंग किंवा कच्च्या नैसर्गिक खड्यांवरील प्रक्रिया यांचा समावेश आहे. ‘जेमोलॉजी’च्या क्षेत्रातील करियरच्या संधींमध्ये विविध पदे आणि कार्यक्षेत्रे आहेत. त्यातील काही खाली नमूद केल्याप्रमाणे आहेत.
 
 
लॅब जेमोलॉजिस्ट : नवीन खड्यांचा शोध, तपासणी आणि अभ्यास त्यांच्या मूल्यमापनासह.
 
 
जेमस्टोन अप्रेझर : एखाद्या खड्याची काळजीपूर्वक तपासणी करणे आणि त्याचा विशिष्ट जागतिक बाजारपेठेतील किमतीवर आधारित राहून अंदाज करणे.
 
 
खड्यांचे उत्पादन : यात कच्च्या खड्यांसाठी कारागिरी तसेच इतर प्रक्रियांचा समावेश आहे, जेणेकरून खड्याचे दिसणे आणि टिकाऊपणा यात सुधारणा होऊ शकते.
 
जेमस्टोन ज्वेलर : अनेक ख्यातनाम ज्वेलर्स आपल्याकडे मौल्यवान खड्यांची दुरुस्ती आणि पुनःकापणी यांच्यासाठी जेमोलॉजिस्टची नेमणूक करतात.
 
डायमंड ग्रेडर : ४ ‘सी’ वर आधारित राहून (कट, कलर, क्लॅरिटी आणि कॅरेट वेट) हिर्‍यांचे विविध श्रेणींवर दर्जाकरण केले जाते. या ग्रेडेशनमधून हिर्‍याची किंमत ठरते. भारतात मोठ्या प्रमाणात हिरे पॉलिश उद्योग आहे. त्यामुळे डायमंड ग्रेडरसाठी मोठ्या संधी आहेत.
 
ज्वेलरी डिझायनर्स आणि सेटर्स : यासाठी फक्त ‘जेमोलॉजी’चेच नाही तर मौल्यवान धातूचेही ज्ञान आवश्यक असते आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणावर कल्पनाशक्ती, कलात्मकता, अद्ययावत फॅशन प्रवाहांची माहिती व तांत्रिक कौशल्यांची गरज असते.
 
वरील करियरचे पर्याय जागतिक तसेच भारतीय परिस्थितीत उपलब्ध आहेत. मात्र, जागतिक दृष्टिकोनातून खालील दोन करियर पर्यायांना जास्त मागणी आहेत.
 
ऑक्शन जेमोलॉजिस्ट : परदेशी लिलाव गृहे, जे रत्ने, खडे आणि विविध मौल्यवान दागिने बाळगतात व त्यांना या दोन्ही वस्तूंची किंमत लिलाव करताना किंवा खासगी मालकांकडून खरेदी करताना तपासणे आवश्यक असते.
 
जेम म्युझियम जेमोलॉजिस्ट्स : जगातील सर्व रत्ने आणि खड्यांच्या वस्तुसंग्रहालयांना प्रदर्शनात असलेल्या खास वस्तूंचे मूल्य निश्चित करण्यासाठी प्रशिक्षित जेमोलॉजिस्ट्सची गरज असते. त्यामुळे हे कोणत्याही शंकेविना म्हणता येईल की, जेमस्टोन बाजारपेठेतील सातत्याने वाढती मागणी, ‘जेमोलॉजी’तील भारतीय तसेच जागतिक दृष्टिकोनातून करियरच्या संधी दिवसेंदिवस व्यापक होणार आहेत.
 
 
‘जेमोलॉजिस्ट’ बनण्यासाठी पात्रता
 
 
‘जेमोलॉजिस्ट’ बनण्यासाठी विद्यार्थ्यांनी इयत्ता १२वी पासूनच त्यांच्या करिअरबाबत योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. इयत्ता १२वीचे कोणत्याही शाखेतील विद्यार्थी ‘जेमोलॉजी’मध्ये कोर्स करण्यास पात्र असले तरी इच्छुक उमेदवार या क्षेत्रामध्ये अल्पकालीन प्रमाणपत्र व डिप्लोमा कोर्सेसदेखील करू शकतात. ‘जेमोलॉजी’च्या कोर्समध्ये नोंदणी करण्यासाठी कोणतीच प्रवेश परीक्षा घेतली जात नाही. भारतातील संस्थांकडून या क्षेत्रामध्ये पदवी, पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम अशा विविध कोर्सेसचे शिक्षण दिले जाते. काही कोर्सेसची यादी पुढीलप्रमाणे :
 
 
 
 
gemss_1  H x W:
 
 
 
सर्टिफिकेट कोर्सेस इन जेमोलॉजी
 
> सर्टिफिकेट कोर्स इन हार्ड शेप ग्रूव्हिंग
> सर्टिफिकेट कोर्स इन इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ डायमंड ग्रेडिंग
> सर्टिफिकेट कोर्स इन ग्रेडिंग, कटिंग, पॉलिशिंग, ब्रूटिंग
> सर्टिफिकेट कोर्स इन कलर्ड जेमस्टोन कटिंग अ‍ॅण्ड पॉलिशिंग
> कोर्सेस इन ज्वेलरी डिझाईन अ‍ॅण्ड मशिन कास्ट ज्वेलरी
> सर्टिफिकेट कोर्स इन प्लानिंग अ‍ॅण्ड मार्केटिंग
 
डिप्लोमा कोर्सेस इन जेमोलॉजी
 
> डिप्लोमा इन डायमंड ट्रेड मॅनेजमेंट
> डिप्लोमा इन जेमोलॉजी
> डिप्लोमा इन डायमंड प्रोसेसिंग
 
बॅचलर्स कोर्सेस इन जेमोलॉजी
 
> बॅचलर्स ऑफ फाईन आर्ट्स इन ज्वेलरी डिझाईन
 
मास्टर कोर्सेस इन जेमोलॉजी
 
> पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डायमंड टेक्नोलॉजी
> मास्टर्स ऑफ फाईन आर्ट्स इन ज्वेलरी डिझाईन
 
 
विषय संयोजन : जेमोलॉजिस्ट बनण्यासाठी इयत्ता १२वीमध्ये किंवा पदवीस्तरीय शिक्षणामध्ये विशिष्ट विषय संयोजनाची आवश्यकता नाही.
 
 
पात्रता : पदवी कोर्सेस, डिप्लोमा कोर्सेस आणि प्रमाणपत्र कोर्सेससाठी अर्जदार मान्यताकृत विद्यापीठ/मंडळामधून कोणत्याही शाखेमध्ये इयत्ता १२वीची परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
 
 
> हे कोर्सेस करण्यासाठी अर्जदारांचे किमान वय १८ वर्षे असले पाहिजे.
> या कोर्सेससाठी कोणतीही कमाल वयोमर्यादा नाही.
> मास्टर कोर्सेससाठी अर्जदार मान्यताकृत विद्यापीठ/संस्थेमधून कोणत्याही विषयामध्ये पदवी शिक्षण उत्तीर्ण असावा.
> काही संस्था/विद्यापीठे विशेषत: ‘जेमोलॉजी’ क्षेत्रांमध्ये ऑनलाईन कोर्सेस देखील देतात.
 
 
‘जेमोलॉजिस्ट्स’साठी रोजगार संधी
 
 
मौल्यवान रत्नांच्या दागिन्यांच्या वाढत्या मागणीमुळे ‘जेमोलॉजिस्ट्स’साठी रोजगार संधी वाढल्या आहेत. दागिन्यांच्या विविध क्षेत्रांमध्ये ‘जेमोलॉजिस्ट्स’साठी अनेक रोजगार संधी आहेत. त्यांना रत्न कटिंग, पॉलिशिंग व टणक रत्नांवरील ट्रिटमेंट अशा विशेषीकृत औद्योगिक क्षेत्रांमध्येही उत्तम रोजगार संधी मिळू शकतात. खाली काही विभाग दिले आहेत, जेथे ‘जेमोलॉजिस्ट्स’ना रोजगार मिळू शकतात :
 
 
१. ज्वेलरी बिझनेस मॅनेजमेंट
२. जेम टेस्टिंग लेबोरॅटरीज
३. रिटेल ज्वेलरी बिझनेस
४. ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग
५. मायनिंग इंडस्ट्री
६. प्रॉडक्ट डेव्हलपमेंट डिपार्टमेंट्स
७. आर्ट ऑक्शन हाऊसेस
८. जेम एक्स्पोर्टिंग कंपनीज
९. टॉप नॉच गोल्डस्मिथ्स
१०. ज्वेलरी शॉप्स अ‍ॅण्ड शोरूम्स
११. इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरिंग सिन्थेटिक किंवा आर्टिफिशियल जेम्स
 
 
‘जेमोलॉजिस्ट्स’साठी टॉप रिक्रुटिंग कंपन्या/उद्योग
 
 
काही अव्वल कंपन्या/उद्योगांची यादी पुढीलप्रमाणे :
 
 
> जेमोलॉजिकल सायन्स इंटरनॅशनल
> जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया
> डायनी ज्वेल्स
> सॉलिटेअर जेमोलॉजिकल लेबोरॅटरीज
> डायमंड ज्वेल्स
> इंडिपेण्डंट जेमोलॉजिकल इंडस्ट्रीज
> जीएस जेम स्कॅन लेबोरॅटरीज प्रा. लि.
 
 
सूचना : जेमोलॉजिस्ट महाविद्यालये/ विद्यापीठे/संस्थांमध्ये शिक्षक किंवा व्याख्याते म्हणून देखील काम करू शकतात.
 
 
‘जेमोलॉजिस्ट’ची वेतनश्रेणी/पगार
 
 
‘जेमोलॉजिस्ट’चा पगार त्यांचे ज्ञान, कौशल्ये व अनुभवानुसार वेगवेगळा असू शकतो. सामान्यत: पगारात ज्ञानामध्ये वाढ व काळासह वाढ होते. ‘जेमोलॉजिस्ट’च्या विविध प्रकारच्या नोकरींसाठी काही संबंधित पगाराची आकडेवारी लेखातील तक्त्यात दिली आहे.
 
 
‘जेमोलॉजिस्ट’ बनण्याचे फायदे
 
 
हा तारांकित व्यवसाय आहे, जेथे तुम्हाला सतत मौल्यवान व अर्ध-मौल्यवान रत्ने व खनिजे हाताळावी लागतील.
‘जेमोलॉजिस्ट’ म्हणून करिअरसाठी बाजारपेठ मागणी वाढतच आहे.
या व्यवसायामध्ये प्रचंड विकासासोबत उत्तम पगार मिळण्याची खात्री आहे.
अनुभव व पदांमधील वाढीसह पगारदेखील वाढतो.
‘जेमोलॉजिस्ट’ बनण्याच्या त्रुटी
या व्यवसायासाठी या उद्योगक्षेत्रात भरभराट मिळण्याकरिता अथक मेहनत व उच्चस्तरीय कौशल्याची आवश्यकता आहे.
‘जेमोलॉजिस्ट’ म्हणून तुम्हाला तुमचे कौशल्य सिद्ध करण्यासाठी अविरत वेळ ‘जेम ग्रेडिंग व पॉलिशिंग लेबोरॅटरीज’मध्ये व्यतीत करावा लागतो.
प्रमोशन, वरिष्ठ पातळीवरील पदांसाठी अपग्रेडिंग इत्यादीकरिता कमी संधी असते.
कधी-कधी ठरवलेले काम मुदतीमध्ये पूर्ण करण्याचा तणाव व दबाव असेल.
 
 
 
- सयोनी मित्रा
(लेखिका साहाय्यक भूगर्भशास्त्रज्ञ-रत्नशास्त्र विभाग,
सीएचक्यू, भारतीय भूशास्त्रीय सर्वेक्षण-आहेत.)
 
 
@@AUTHORINFO_V1@@