पुणे : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सीरमच्या बीसीजी लस बनवण्याच्या इमारतीत दुपारी दोन वाजताच्या सुमारास आग लागली. जिथे लस बनवली जाते तिथेच आगीचा भडका उडाला. सीरम इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नवीन प्लांट आहे.
राजेश टोपे म्हणाले, “मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. इमारतचे काम सुरू होते. वेल्डिंगच्या स्पार्कमुळे ही आग लागली आणि वाढली. आता आग विझवण्यात आली आहे. आग आटोक्यात यायला दोन ते तीन तासांचा कालावधी लागला. आगीत पाच जणांचे मृतदेह आढळले आहेत.” कोरोना लस निर्मिती करण्यात येणारी इमारत घटनास्थळापासून दूर होती. त्यामुळं लसीला कुठलंही नुकसान नाही. यासंदर्भात पोलिस तपास सुरू आहे, असे टोपेंनी सांगितले. दरम्यान, काही काळानंतर आग पुन्हा भडकल्याचीही माहिती आहे.
कोव्हीशिल्ड लसीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इंस्टीटयूटमध्ये आग लागल्याने घटनास्थळी एकच खळबळ माजली. अग्निशमन दलाच्या ५ गाड्या ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. 'डीसीजी' या लसीचे उत्पादन जिथे होते, त्याच मजल्यावर ही आग लागल्याचे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या लक्षात आले. आणि नागरिकांनी एकच गर्दी केली. परंतु, ज्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधित लस बनवली जाते, ते ठिकाण मात्र आगीच्या भडक्यापासून सुरक्षित आहे, अशी माहिती आदर पुनावाला यांनी दिली आहे.
दरम्यान, ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनच्या 'कोविशिल्ड' या लसीचे उत्पादन पुण्यातील सिरम इंस्टीट्यूटमध्ये होत आहे.हिंदुस्थानमध्ये या लसीच्या आपातकालीन वापराला परवागनगीही मिळाली असून लसीकरणाला सुरुवातही झाली आहे. 'कोविशिल्ड' लसीचे उत्पादन सुरू असलेली इमारत सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.