सकारात्मकतेची त्रीसुत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2021
Total Views |

homeopathy_1  H







नैसर्गिक ऊर्जेच्या शुद्धतेमध्ये जर काही उलथापालथ झाली, तर नैसर्गिक आपत्ती येते. तसेच शारीरिक ऊर्जेमध्ये जर नकारात्मक उलथापालथ झाली, तर आजार उद्भवतात. या शरीरातील ऊर्जेला सदैव निरोगी ठेवणे, हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते. परमेश्वराने आपल्याला ‘कर्मस्वातंत्र्य’ दिले आहे. त्यामुळे आपल्या चांगल्या कर्माने या नैसर्गिक व वैश्विक ऊर्जेला जी शरीरात असते, तिला शुद्ध ठेवायचे की चुकीच्या वागण्याने या ऊर्जेला क्षीण करायचे, हे पूर्णतः आपल्या हातात असते. त्यामुळे याआधीही आपण पाहिल्याप्रमाणे चांगला आहार, विहार, आचार, विचार यांमुळेच ही ऊर्जा शुद्ध व निरोगी ठेवता येते. आपली मूलभूत मूल्ये ही यासाठी फार उपयुक्त असतात. खालील घटक हे आपली मूलभूत तत्त्वे ठरवित असतात.




१) प्रामाणिकपणा
: सर्वप्रथम स्वतः स्वतःशी प्रामाणिक राहाणे हे सर्वात महत्त्वाचे असते. स्वतःच्या मतांशी व कृत्याशी प्रामाणिक राहणे हे सर्वप्रथम करावे. त्यानंतर इतरांशी प्रामाणिकपणे वागता येईल. यामुळे शरीरातील ऊर्जेला कुठल्याही चुकीच्या कामासाठी खर्च व्हावे लागत नाही व पर्यायाने ही ऊर्जा सदैव सकारात्मक व शक्तिशाली असते व त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण तयार होत असते.
 
 
 
 
२) विश्वास, भरवसा असणे : संपूर्ण दुनिया ही या विश्वासावर चालत असते. Trust forms a strong pillar and makes the relation healthy. जगाची अर्थव्यवस्था, शेअर मार्केट हे सर्व विश्वासावरच चालत असते. विश्वासाने भरवसा उत्पन्न होतो. भरवशाने प्रेम उत्पन्न होते व प्रेम हे मूलतः नैसर्गिक शुद्धतेचे स्वरूप असल्याने आपोआपच शरीरातील ऊर्जा ही सकारात्मक व शुद्ध राहते व माणसाला आजार होत नाही.
 
 
 
 
३) सकारात्मक आशावाद : सकारात्मक आशावादामुळे धैर्य येते व कार्य करण्यासाठी बळ मिळते. माणसाला पुढच्या क्षणी काय होणार आहे, याची यत्किंचितही माहिती नसते. माणूस अनेक प्रकारचे भविष्यातील ‘प्लान्स’ बनवत असतो. सकारात्मक आशावादावरच हे अवलंबून असते व यावरच ऊर्जेचीशक्ती शुद्ध ठेवण्याची क्षमता असते.
 
 
 
 
सकारात्मकता, प्रामाणिकपणा, विश्वास, सकारात्मक आशावाद याचा उपयोग सर्वप्रथम स्वतःचीउन्नती करण्यासाठी जे लोक करतात, त्यांची चैतन्यशक्ती नेहमीच मजबूत राहते. जर जगाला ओळखायचे असेल, तर सर्वप्रथम स्वतःला ओळखायला शिकावे, हीच खरी गोम आहे. First you understand yourself and Then try to understand others. ज्यावेळी आपण आपल्या चैतन्यशक्तीला ओळखायला शिकतो, आपल्या स्वतःच्या ऊर्जेला शक्तिशाली बनवण्याचे उपाय जर आपल्याला सापडले, तर त्याचा उपयोग हा पर्यायाने समाजासाठी ही करता येतो.
 
 
 
 
स्वतःला,स्वतःच्या ऊर्जेला ज्यांनी ओळखले, अशा संत-महात्मे, पवित्र विभूतींनी मग त्यांच्या अनुभवाद्वारे लोकांना आपली चैतन्यशक्ती कशी शुद्ध व पवित्र ठेवता येईल, यांचे मार्गदर्शन केले व यातूनच मग श्रीज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत, तुकारामांची गाथा, ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांची प्रवचने अशी पवित्र ग्रंथसंपदा निर्माण झाली. त्यात चैतन्यशक्तीला व पर्यायाने शरीराला कसे व मनाला कसे निरोगी ठेवता येईल, याचे मार्गदर्शन केले गेले आहे. पुढे आपण अजून काही मूलभूत तत्त्वांचा अभ्यास करणार आहोत.
 
 
डॉ. मंदार पाटकर
(लेखक एम.डी होमियोपॅथी आहेत.)

@@AUTHORINFO_V1@@