‘तांडव’ आणि ‘अ‍ॅमेझॉन’ला उत्तर प्रदेश सरकारचा तडाखा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2021
Total Views |
Tandav _1  H x




नवी दिल्ली
: ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’ या ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’वर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘तांडव’ या वेबसीरिजच्या विरोधात उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ सरकारने जोरदार तडाखा दिला आहे. ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’ इंडियाचे प्रमुख, वेबसीरिजचे लेखक, दिग्दर्शक, प्रोड्युसर आणि अन्य साहाय्यकांविरोधात हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.
 
 
 
 
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘तांडव’ या वेबसीरिजमध्ये राजकीय नाट्य दाखविण्यात आले आहे. सैफ अली खान, डिंपल कपाडिया, तिग्मांशु धुलिया आदी कलाकारांनी यामध्ये प्रमुख भूमिका केली आहे. मात्र, यामध्ये हिंदू देवदेवतांचे विकृत चित्रीकरण, त्यांच्या तोंडी शिवीगाळ दाखविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दलित समाजाविषयीदेखील अतिशय खालच्या दर्जाची भाषा वापरण्यात आली आहे.
 
 
 
त्यामुळे देशभरात या मालिकेविरोधात रोष निर्माण झाला. त्याची दखल घेत उत्तर प्रदेशमध्ये हजरतगंज पोलीस स्थानकात ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’ इंडियाच्या प्रमुख अपर्णा पुरोहित, मालिकेचे दिग्दर्शक अली आब्बास जफर, प्रोड्युसर हिमांशु कृष्ण मेहरा, लेखक गौरव सोलंकी आणि अन्य मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




@@AUTHORINFO_V1@@