मुंबईत रेल्वे अपघातावर, कोरोनाने लावला ब्रेक!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2021
Total Views |

TRAIN ACCIDENT _1 &n

 

 
मुंबईत रेल्वे अपघातावर, कोरोनाने लावला ब्रेक!

 

मुंबई : मुंबईची उपनगरीय लोकल ट्रेन म्हणजे मुंबईची लाइफ लाइन. दररोज ८० लाखपेक्षा जास्त प्रवासी उपनगरीय रेल्वे गाड्यातून प्रवास करतात परंतु लॉकडाऊनमुळे मार्च २०२० पासून लोकल ट्रेन सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद करण्यात आली आणि गेले दहा महिने लोकल बंद आहे. त्यामुळे २०१९ वर्षाचा तुलनेत २०२० मध्ये अपघाताची टक्केवारी ६५ टक्क्यांनी कमी झाली आहे अशी माहिती ,माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत मिळाली आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई रेल्वे पोलीस यांच्याकडे जानेवारी २०२० पासून दिसंबर २०२० पर्यंत मुंबई उपनगरीय रेल्वेगाड्यातून पडून किंवा रेल्वे पटरी क्रॉस करताना किती लोकांच्या मृत्यू किवा जखमी झाले आहे याची माहिती माहिती मागितली होती. या संदर्भात मुंबई रेल्वे पोलिसांचे जनमाहिती अधिकारी यांनी माहिती दिल्याप्रमाणे , २०१९ तुलनेत २०२० मध्ये अपघात कमी झाले आहे . दरवर्षी लोकलमध्ये अनेक अपघात घडून अनेकांचे मृत्यू झाल्याचे आपण पाहतो, त्यामध्ये २०२० ची आकडेवारीही कमी असल्याने, अशीच आकडेवारी पुढेही कमी व्हावी यासाठी रेल्वेप्रशासनाने प्रयत्न करावे असे सर्व सामान्य म्हणत आहेत.

रेल्वे अपघाताची रेल्वे प्रशासनाने माहिती दिल्यानुसार, मुंबई उपनगरी रेल्वे पटरीवर रेल्वेनगाड्यातून पडून किंवा पटरी क्रॉस करताना २०२० मध्ये १११६ प्रवाशांना आपले जीव गमावले आहे, यामध्ये दुर्घटनेत ९८३ पुरुष व १३३ महिला प्रवाशांचा समावेश आहे. तसेच ८७८ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामध्ये ६८८ पुरुष व १९० महिलाप्रवाशांचा समावेश आहे. यंदा कोरोनामुळे रेल्वे बंद असल्यामुळे, रेल्वे अपघात जास्त झालेले नाही. देशात रेल्वे अपघात ही मोठी समस्या आहे. त्यामध्ये यंदाची आकडेवारी ही चिंता वाढवणारी नाही . मात्र रेल्वे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाला अजूनही अधिक कष्ट घेण्याची गरज असल्याचं दिसत आहे.मुंबई उपनगरीय रेल्वे ट्रॅकवर रेल्वे रुळ ओलांडताना किंवा ट्रॅक ओलांडताना २०१३ पासून २०१९ पर्यंत एकूण २४५३४ प्रवासी प्राण गमावले आणि एकूण २६६७५ प्रवासी जखमी झाले.

वर्षाप्रमाणे किती मृत्यू आणि लोक जखमी झाले आहे पहा

२०१३ मध्ये एकूण ३५०६ प्रवाशांच्या मृत्यू, ३३१८ जखमी

२०१४ मध्ये एकूण ३४२३ प्रवाशांच्या मृत्यू, ३२९९ जखमी

२०१५ मध्ये एकूण ३३०४ प्रवाशांच्या मृत्यू, ३३४९ जखमी

२०१६ मध्ये एकूण ३२०२ प्रवाशांच्या मृत्यू, ३३६३ जखमी

२०१७ मध्ये एकूण ३०१४ प्रवाशांच्या मृत्यू, ३३४५ जखमी

२०१८ मध्ये एकूण २९८१ प्रवाशांच्या मृत्यू, ३३४९ जखमी

२०१९ मध्ये एकूण २६६४ प्रवाशांच्या मृत्यू, ३१५८ जखमी

२०२० मध्ये ऐकून १११६ प्रवाशांच्या मृत्यू , ८८७ जखमी

@@AUTHORINFO_V1@@