शिवसेनेचे हिंदुत्व सोयीस्कर आहे: राम कदम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2021
Total Views |

ram kadam_1  H



हिंदू देवतांना लक्ष्य करणार्‍या दोषींना शिवसेना पाठीशी घालते असा थेट आरोप




तांडव वेब सिरीजच्या वादात शिवसेनेवर टीकास्त्र


मुंबई: अॅमेझोन प्राईमच्या 'तांडव' या वेब सिरीजवरून सध्या खूप गदारोळ माजलेला आहे. आणि यावरूनच भाजप आमदार राम कदम यांनी याबाबतीत ट्विट करत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.


"आम्ही हिंदूंच्या अभिमानासाठी लढा देत आहोत आणि आमच्या हिंदू देवतांची थट्टा करण्याचे धाडस कोणी करु नये यासाठी प्रयत्न करीत आहोत. मात्र हिंदुत्व - शिवसेना या बनावट संरक्षकांचे काय झाले? महाराष्ट्रातही एफआयआर नोंदविला जात नाही." असं ट्विट करत भाजप आमदार राम कदम यांनी शिवसेनेच्या हिंदुत्ववादावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.



त्याचप्रमाणे राम कदम यांनी "सेनेचे हिंदुत्व सोयीस्कर आहे. हिंदुत्वासाठी मुंबईच्या रस्त्यावर आंदोलन करणारी ही सेना आता आपल्या हिंदू देवतांना लक्ष्य करणार्‍या दोषींना वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहे." असे स्पष्ट वक्तव्य केले आहे.



'तांडव' ही वेब सिरीज शुक्रवारी रिलीज झाल्यापासूनच यामध्ये हिंदू देवी- देवतांचा अपमान किंवा विडंबना केली आहे, असा आरोप लावला जात आहे. एरवी वेब सिरीज मधली आक्षेपार्ह दृश्य वगळा किंवा ठराविक शब्दांसाठी बीप लावा अशा पद्धतीने विरोध होतोच. पण यावेळी मात्र वेब सिरीज थेट बॅन करा, अशीच मागणी टीका करणाऱ्यांनी सुरु केली आहे. आणि यामध्ये अनेक संघटनांसह भाजप नेत्यांचाही समावेश आहे.




@@AUTHORINFO_V1@@