ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2021
Total Views |
grampanchyat result_1&nbs
 
 
 
 
 
मुंबई : राज्यातील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 15 जानेवारीला पार पडल्या. या निवडणुकीसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 79 टक्के मतदान झाले आहे. आज या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागण्यास सुरुवात झालेली आहे. मतमोजणी हे सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झाली आहे. हळूहळू काही ग्रामपंचायतीचे निकाल स्पष्ट होत आहेत , तर अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळतेय. संध्याकाळपर्यंत सर्व निकाल स्पष्ट होणार आहेत कोण विजयी आणि कोण पराभूत हे कळणार आहे.ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी महाएमटीबी पाहत राहा
 
 
 

आमदार अँड आशिष शेलार यांनी सासुरवाडीची ग्रामपंचायत जिंकली 

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील दांडेली ग्रामपंचायत शिवसेनेकडून हिसकावून घेण्यात भाजपला यश मिळाले. दांडेली हे गाव भाजपचे नेते तथा आमदार आशिष शेलार यांची सासूरवाडी असून दांडेली ग्रामपंचायत बरीच वर्षे शिवसेनेकडे होती. मात्र यावेळी ती ग्रामपंचायत भाजपकडे आली आहे.भाजप नेते आशिष शेलार स्वत: या ठिकाणी प्रचारासाठी आले होते. त्यामुळेच या ग्रामपंचायतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.
 
 

कोकणात राणे पॅटर्न  


 
 
 
 सिंधुदुर्ग - जिल्ह्यात भाजपने आपले वर्चस्व कायम राखले आहे. भाजपकडे 43 ग्रामपंचायती तर सेनेकडे 23 ग्रामपंचायती आल्या आहेत. राष्ट्रवादीने 1 आणि गाव पॅनेलने 3 ग्रामपंचायती राखल्या आहेत. मालवनमध्ये आमदार वैभव नाईक यांना तर सावंतवाडीमध्ये माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांना मोठा धक्का बसला आहे.  भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांना मोठा धक्का , बोरी ग्रामपंचायतमध्ये 17 पैकी 14 जागांवर राष्ट्रवादीचा विजय , राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या गटाचा विजय
 

जालन्यात पोलीसांचा लाठीचार्ज 

 
 जालना : जिल्ह्यातल्या भोकरदन मतमोजणी केंद्रावर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. ग्रामपंचात निवडणुकांसाठीची मतमोजणी असल्यानं गावागावातले नागरिक मतमोजणी केंद्रावर गर्दी करत असतात. भोकरदन मतमोजणी केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.जिल्ह्यातील 
 
 

 भंडारा तालुक्यातील 18 पैकी 14 जागेवर भाजपा गटाने बाजी मारली

 
 
 सोलापूर : माळशिरस तालुक्यातील भाम्ब येथे राष्ट्रवादी उमेदवार चिट्ठीवर तर बीजवडी मध्ये भाजप उमेदवार चिट्ठीवर विजयी दोन्ही ठिकाणी समसमान मते मिळाल्याने चिट्ठी टाकण्यात आला होत्या
 
 
जळगावात तृतीयपंथी उमेदवार विजयी 
 
 
जळगाव : तालुक्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अंजली हिने वॉर्ड क्रमांक चारमधून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तिच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेऊन तो बाद केला. तृतीयपंथी असल्याने तिला महिला प्रवर्गातून उमेदवारी करता येणार नाही, मतदार यादीतही तिच्या नावापुढे लिंगाचा उल्लेख 'इतर' असा असल्याने तिला उमेदवारी नाकारण्यात आली होती. मात्र, अंजलीने हार मानली नाही. तिने आपली सहकारी तृतीयपंथी शमिभा पाटील हिच्या मदतीने न्यायासाठी थेट उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे दार ठोठावले. या ठिकाणी कायदेशीर बाजू मांडल्याने तिचा न्याय मिळाला. न्यायालयाने तिच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिला. म्हणून शेवटी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तिची उमेदवारी मान्य करावी लागली. गावाचा विकास हाच त्यांचा असेल असं त्यांनी सांगितलं 
 
 
भाजपच बाहुबली - उपाध्ये 
 
 
 ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला घवघवीत यश, ग्रामीण भागात सरकारबद्दल नाराजी, १४ हजारपैकी ६ हजार गावात भाजप एक नंबर असेल, कोकणात यंदा भाजपला जास्त मतं, मालवणमधील पाच ग्रामपंचायतीत भाजपला यश, भाजप नेते केशव उपाध्ये यांचा दावा.  
 

आदर्श गावा भूकंप 

 
 

औरंगाबाद - जिल्ह्यातील 'आदर्श गाव' अशी ओळख असलेल्या पाटोदा गावाच्या राजकारणात भूकंंप झाला आहे. तीस वर्षे पाटोद्याच्या ग्रामपंचायतीत एक हाती सत्ता असलेले भास्करराव पेरे पाटील यांच्या पॅनेलचा निवडणुकीत धुव्वा उडाला. त्यांच्या मुलीलाही या निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहावे लागले. ग्रामपंचायत निवडणुकीचा हा निकाल भास्करराव पेरे पाटलांना धक्का देणारा ठरला.पंढरपूरमध्ये 24 पैकी 17 ग्रामपंचायतीत आमदार प्रशांत परिचारक गट विजयी. 



अण्णा हजारेंचे पॅनल विजयी 


ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं गाव असलेल्या राळेगणसिद्धिमध्ये अण्णा हजारेंचा पाठिंबा असलेल्या ग्रामविकास पॅनलचा विजय झाला आहे. राळेगणसिद्धिमधील 9 पैकी 5 जागांवर ग्रामविकास पॅनलचा विजय झाला आहे. 



अंबरनाथमध्ये शिवसेनेला हादरा 

 
अंबरनाथ तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नेवाळीमध्ये शिवसेनेला हादरा बसला आहे. 11 पैकी 9 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर शिवसेनेच्या वाट्याला अवघ्या दोन जागा आल्या आहेत. नेवाळी ग्रामपंचायतीमध्ये 13 जागा होत्या, त्यामधील दोन प्रभागात बहिष्कार असल्याने 11 जागांवर निवडणूक होणार होती. मात्र 11 पैकी 3 जागा बिनविरोध झाल्या. यामध्ये शिवसेना एक तर दोन जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध आले. उर्वरित आठ जागांवर निवडणूक झाली यामधील एका जागेवर शिवसेना तर उर्वरीत सात जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले.
 
 
 

आरोग्यमंत्र्यांच्या गावात काँग्रेस विजयी 

 
 
 
 पुणे : खेड शिवापूरची ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात, शिवसेना जिल्हाध्यक्ष रमेश बापू कोंडे यांनी राखला शिवसेनेचा गड, 11 जागांपैकी 9 जागा शिवसेनेला तर अवघ्या 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या गावात राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला आहे. टोपे यांच्या पाथरवाला गावात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा विजय झाला आहे. गावातील 13 पैकी 13 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झाल्याचं पाहायला मिळत आहे. 
 
 
 

 या दिग्गजांना फटका 

 
 
ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी, विखे, चंद्रकांत पाटील, राम शिंदेसह अनेक दिग्गजांच्या गटाला फटका बसला. 



रत्नागिरीत घड्याळाचा करिश्मा 

 
सावर्डे ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांचे निर्विवाद वर्चस्व 9 पैकी 9 जागांवर आमदार शेखर निकम यांच्या पॅनलचे उमेदवार विजयी ग्रामपंचायतीमध्ये 17 उमेदवारांपैकी 8 जागा यापूर्वी झाले होते.सावर्डे ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार शेखर निकम यांची प्रतिष्ठा लागली होती. 

 

 

लोणी खुर्द गावात सत्ता परीवर्तन, विखेंच्या पॅनलला पराभवाची धूळ

 
 
 
लोणी खुर्द गावात सत्ता परीवर्तनविखे विरोधी गटाने 17 पैकी 11 जागा मिळवत विखे गटाची सत्ता आणली संपुष्टातलोणी खुर्द ग्रामपंचायत निवडणुक परिवर्तन पॅनलला मिळाले यश जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यासह जळगाव ग्रामीणमध्ये शिवसेनेचे वर्चस्व,अनेक ग्रामपंचायतीत शिवसेनेचे उमेदवार आले निवडून अमरावती जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक...यशोमती ठाकूर यांच आपल्या गावात अविरत वर्चस्व कायम... महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मोझरी गावात काँग्रेसची एकहाती सत्ता....यशोमती ठाकूर यांच आपल्या गावात अविरत वर्चस्व कायम...13 पैकी 8 जागा यशोमती ठाकूर यांच्या पॅनलच्या विजयी...विरोधी गटाचा मोझरीत धुव्वा....
 
 

 नंदुरबारमध्ये भाजपचा विजय 

 
 
 
नंदुरबार तालुक्यातील भालेर ग्रामपंचायत मध्ये सत्ता बद्दल 11पैकी 6 जागांवर भाजपा विजयी...शिवसेनेला 5 जागा..
आगोदर सेना नेते चंद्रकांत रघुवंशी गटाचा ताब्यात होती भालेर ग्रामपंचायत...रायगड अलिबाग तालुक्यातील सासवणे ग्रामपंचायत शेकापकडे
 
 

कर्जतमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडी विजयी  

 
 
 
कर्जत तालुक्यातील महत्वाच्या कडाव ग्रामपचांयत मध्ये स्थानिक विकास आघाडी बहुमतात.13 पैकी 10 स्थानिक विकास आघाडीकडे तर 3 सेने कडे.सेनेकडुन 15 वर्षा नतंर ग्रामपचांयत राष्ट्र्वादी पुरस्क्रुत स्थानिक आघाडीकडे.


आबांच्या सांगलीत राष्ट्रवादीत विजय  

 
 
 
सांगली-: तासगाव तालुक्यातील सावळज ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर आर आर पाटील गटाच्या राष्ट्रवादीने मिळवला विजय -
राष्ट्रवादी- १४ तर भाजप - ३ जागांवर विजयी 

 
 
 
सांगली - खानापूर तालुक्यात आमदार अनिल बाबर गटाची सरशी. 13 पैकी 9 ग्रामपंचायतवर सत्ता माजी आमदार सदाशिवराव पाटील गटाकडे 2 ,जेष्ठ नेते रामरावदादा पाटील गटाकडे 1,युवक नेते सुहास शिंदे गटाकडे 1 ग्रामपंचायत, पारे, नागेवाडी,माहुली, देवींखिंडी,रेणावी या मोठया ठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व


 
परभणीतील 498 ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सुरुवात, कार्यकर्त्यांची केंद्राबाहेर गर्दी


 
नंदुरबार तालुक्यातील भाडवड ग्रामपंचायत निवडणुकीत दोन उमेदवारांना सारखी 222 मते नंदुरबार तालुक्यातील भाडवड ग्रामपंचायत निवडणुकीत दोन उमेदवारांना सारखी 222 मते ईश्वर चिठ्ठीने योगेश भटू राजपूत ईश्वर चिठ्ठीने विजयी..संजय राजपूत पराभूत. योगेश राजपूत 222  संजय राजपूत 222
 
 
 
 
नवापूर तालुक्यातील वडकळंबी वार्ड क्रमांक दोन मध्ये दोघी उमेदवारांना एकसारखी मते मिळाली. ईश्वर चिठ्ठी काढून विनू रविश गावित विजयी रविता दिलीप गावित 118 विनू रविश गावित 118
 
 
 
 
अहमदनगर- भाजप नेते राम शिंदे यांच्या चौंडी गावात भाजपच्या पॅनलचा पराभव, माजी मंत्री भाजप नेते राम शिंदे यांच्या चौंडी गावात भाजपच्या पॅनलचा पराभव,राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ पैकी सात जागा जिंकत केले सत्ता परिवर्तन.राम शिंदेंना मोठा धक्का.. आ.रोहित पवारांचे एकंदरीत जामखेड तालुक्यात मोठे वर्चस्व असल्याचे समोर..
 
 
 
रायगड : रोहा तालुक्यातील रोठखुर्द ग्रामपंचायत मधील राष्ट्रवादीचे 9 च्या 9 उमेदवार विजयी.सुनिल तटकरे, अदीती तटकरेच्या होम पिचवर विजयी सलामी. आदर्श गाव ओळख असलेल्या पाटोदा गावाच्या राजकारणात भूकंंप
 
 
 
औरंगाबाद : जिल्ह्यातील आदर्श गाव अशी ओळख असलेल्या पाटोदा गावाच्या राजकारणात भूकंंपतीस वर्षे पाटोद्याच्या ग्रामपंचायतीत एक हाती सत्ता असलेले भास्करराव पेरे पाटील यांच्या पॅनेलचा निवडणुकीत धुव्वात्यांच्या मुलीलाही या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागलेग्रामपंचायत निवडणुकीचे हे निकाल भास्करराव पेरे पाटलांना धक्का देणारा
सांगली - जत तालुका ग्रामपंचायत 
 
 
वळसंग ग्रामपंचायत निकाल

भाजप-4

काँग्रेस-4

राष्ट्रवादी-1

उमराणी ग्रामपंचायत सत्तांतर ,

भाजप 12 काँग्रेस 4 जागांवर

गुगवाड ग्रामपंचायत काँग्रेसची बाजी -

8 जागा काँगेस

भाजप 3 जागा

येलदरी ग्रामपंचायत काँग्रेसची सत्ता

काँग्रेस - 6

भाजप 3

सत्ता काँग्रेस

शेगाव ग्रामपंचायत भाजपाची सत्ता.

भाजपा 12

काँग्रेस 1 जागेवर विजयी.
 
 
 
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात बहुतांश ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा. जामनेर तालुक्यात बहुतांश ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा...जामनेरात भाजप नेते गिरीश महाजन यांचे वर्चस्व सिद्ध
 
रायगड  - कर्जत तालुक्यातील पोशिर ग्रामपंचायत 11 पैकी 6 जागावर शेकाप शिवसेना युती विजयीपरिवर्तन विकास आघाडीचे 6 उमेदवार विजयी. 

 
पालखेड मध्ये शिवसेनेला मोठा धक्का15 वर्षांनंतर सेनेला धोबीपछाड देत भाजप प्रणित पॅनल चे सर्व 13 उमेदवार विजयीभाजपाचा सेनेला मोठा धक्का. मुंगसारे ग्रामपंचायत निवडणूक निकाल जाहीर, नाशिक तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत
एकूण 9 जागा या पैकी 4 बिनविरोध तर 5 जगांसाठी पार पडली होती निवडणूक प्रक्रियानिवडणूक झालेल्या 5 ही जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयीशिवसेना गट प्रमुख भाऊसाहेब म्हैसधुणे यांच्या पॅनल ला बहुमत
 

सांगली जिल्हा
 
सांगली - मिरज तालुक्यातील कवठेपीरन ग्रामपंचायतीवर शिवसेना नेते भिमराव माने गटाची सत्ता कायम17 पैकी 14 जागांवर विजय .सांगली - तासगाव तालुक्यातील येळावी ,कवठेएकंद,गोटेवाडी मध्ये सत्ता परिवर्तन भाजपाची सत्तातर धुळगाव ग्रामपंचायतीवर भाजपा खासदार गटाची सत्तातर मांजर्डे ,दहिवडी,गोटेवाडी आणि डोरली ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसकडे.
 
सांगली - कडेगाव तालुका

ग्रामपंचायत रामापूर काँग्रेस - ६ भाजप - ३ ,विजयी.

शिरसगाव ,काँग्रेस -९ - विजयी

भाजप - ०

कोतीज काँग्रेस - ६ विजयी

भाजप -१

ढाणेवाडी - काँग्रेस- ०७ विजयी
 

वाशिम जिल्हा मतमोजणी

रिसोड तालुक्यातील

काँग्रेसचे आमदार अमित झनक यांच्या मूळगावी

मांगुळ झनक ग्रामपंचायत वर 9 पैकी 9 जागांवर काँग्रेस चा विजय ...

 
मालेगाव तालुका

ढोरखेडा ग्रामपंचायत वर 7 पैकी 4 जागांवर

राष्ट्रवादी काँग्रेस विजय.....

रिसोड तालुका

केनवड ग्रामपंचायत वर 9 पैकी 8 जागांवर काँग्रेस चा विजय.....

मानोरा तालुका

रतनवाडी ग्रामपंचायत वर 9 पैकी 9 जागांवर स्वप्नील पाटील गटांचा विजय.....

रिसोड तालुका

गोभणी ग्रामपंचायत वर माजी खासदार आनंतराव देशमुख 11 पैकी 7 जनाविकास पॅनल विजयी......
 
गोंदिया जिल्हा

गोंदिया सडकअर्जुनी तालुक्यातिल रेगेपार पांढरी ग्राम पंचायतीत ९ पैकी ९ जागेवरीलउमेदवार ग्राम विकास पॅनल निवडून
आलेली आहे.हा पॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत आहे
 

रत्नागिरी


मंत्री उदय सामंत यांच्या पाली ग्रामपंचायतीत सेनेचं वर्चस्व11 पैकी 11 शिवसेनेचे उमेदवार विजयीरत्नागिरी तालुक्यात ग्रामपंतायती निवडणुकीत शिवसेनेची बाजी
 
सांगली - खानापूर तालुक्यातील माहुली ग्रामपंचायतीवर शिवसेना आमदार अनिलभाऊ बाबर गटाची सत्ता11 पैकी 11 जागांवर विजय.
अमरावती राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस प्रदीप राऊत गटाचे वर्चस्व...
काँग्रेसच्या माजी महिला जिल्हाध्यक्ष छायाताई दंडाळे गटाचा दारुण पराभव...सुरवाडी ग्रामविकास पॅनेलचा दणदणीत विजय..राज्य पणन महासंघाच्या संचालिका छाया दंडाळे यांना सुरवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभवराष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप राऊत व अतुल गवड यांच्या गटाच्या ग्रामविकास पॅनेलने सातपैकी सातही जागा जिंकल्यादंडाळे गटाकडुन ही ग्रामपंचायत हिसकावून घेतली...छाया दंडाळे यांनी आपल्या कन्येला वार्ड क्र.१ मधुन ऊभे केल्याने ही लढत अतिशय प्रतिष्ठेचीकन्या रुचिका दंडाळे यांनाही पराभवाचे तोंड बघावे लागलेरुचिका दंडाळे हिला राऊत -गवड गटाच्या सौ.ललिता प्रमोद बोराळकर यांनी एकतर्फी लढाईत पराभूत केले...
 
 
 
सिंधुदुर्ग ग्रामपंचायत निकाल
सिंधुदुर्गात मतमोजणीला सुरवात, भिरवंडे ग्रामपंचायत शिवसेनेकडेकणकवलीत पहिलीच ग्रामपंचायत शिवसेनेकडे
 
 
 
रत्नागिरी
रत्नागिरी तालुक्यात ग्रामपंतायती निवडणुकीत शिवसेनेची बाजीकर्ला, कळझोंडी, शिवसेनेकडेतर ओरी आणि काळबादेवी ग्रामपंचायत गाव पॅनलकडेओरी ग्रामपंचायतीत गावपॅनलला ७ जागा
 नाशिक तालुक्यातील 22 ग्रामपंचायत मतमोजणीचे पाहिल्या प्रभागातील निकाल जाहीर 22 ग्रामपंचायतीच्या 207 जागा 103 जागांचे निकाल जाहीर विजयी 103 जागांवर काँग्रेस,शिवसेना, राष्ट्रवादीचे वर्चस्व नाशिक तालुक्यातील 22 ग्रामपंचायतीचा 50 % जागांचा निकाल जाहीर
 
 
सांगली - तासगाव तालुक्यातील हातनोली ग्रामपंचायतमध्ये भाजपची सत्ता कायमखासदार संजयकाका गटाची सत्ता.सांगली - मिरज तालुक्यातील कवठेपिरन ग्रामपंचायतीवर शिवसेना नेते भिमराव माने गटाची सत्ता कायम17 पैकी 14 जागांवर विजय .
 
 
 
कोथळी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत नवपरिवर्तन पॅनलचा 5 जागांवर विजय
 
जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत नवपरिवर्तन पॅनलचा 5 जागांवर विजय,1 जागा यापूर्वी बिनविरोध झाली आहेउर्वरित विजयी झालेल्या पाच उमेदवारांमध्ये नेमकं कोणत्या पक्षाचे पुरस्कृत उमेदवार अस्पष्टएकनाथ खडसे यांच्या गावातील आहे ग्रामपंचायत
 
 
 
 
 
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी निवडणूक
कोथळी हे गाव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे गाव
त्यात 5 जागांवर शिवसेना पुरस्कृत उमेदवार निवडून आले
उर्वरित 6 जागांवर राष्ट्रवादी व भाजप समर्थक असलेले उमेदवार निवडून आले
 
 
 
अमरावती काँग्रेस पक्षाच्या माजी महिला जिल्हाध्यक्ष छाया दंडाळे यांच्या मुलीचा व पॅनलचा पराभव...
 
राजापूरमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सेनेला मोठा धक्का
 
 
राजापूरमधील कोंडसरबुदुक ग्रामपंचायतीत ११ सदस्य बीजेपी पुरस्कृत गावपॅनलचे विजयीजिल्हा परिषद सदस्य आणि माजी शिक्षण सभापती दिपक नागले यांचे कोंडसर हे गाव११ ग्रामपंचायत सदस्य भाजपकडे, सेनेला मोठा धक्का
 
 
नाशिक - सय्यद पिंपरी ग्रामपंचायतच्या 17 जागांपैकी 3 जागांवर काँग्रेस विजयी10:47 January 18तासगाव तालुक्यातील कवठेएकंद मध्ये सत्तांतर , राष्ट्रवादीला झटका
तासगाव विद्यमान सत्ताधारी राष्ट्रवादीचा पराभव. भाजप-शेकाप युतीचा विजय -
भाजप-शेकाप : 13
राष्ट्रवादी : 3
अपक्ष :1
 
येवला ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरुवात ...
 
छगन भुजबळांच्या मतदारसंघात कोण बाजी मारत गावकऱ्यांचे लक्षयेवला तालुक्यातील 69 ग्रामपंचायत पैकी 8 ग्रामपंचायत बिनविरोधउरलेल्या 61 ग्रामपंचायती करता मतमोजणीस सुरूवाततहसील कार्यालय येथे मतमोजणी होत आहे .
सांगली खानापूर तालुक्यातील खंबाळे ग्रामपंचायत मध्ये शिवसेनेचे वर्चस्व
 
खानापूर तालुक्यातील खंबाळे ग्रामपंचायत मध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिलभाऊ बाबर गटाचे वर्चस्व7 पैकी 7 जागांवर विजय..पारे ग्रामपंचायतीवरही बाबर गटाची सत्ता - 11 पैकी 11 जागांवर विजय
 
नाशिक ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीला सुरुवात
 
जिल्ह्यात 13 केंद्रावर मतमोजणी सुरूजिल्ह्यातील 565 ग्रामपंचायतीचे आज निकाल11 हजार 56 उमेदवारांचा आज फैसला, 4227 जागाप्रत्यक्ष मतदानापूर्वी 55 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोधयात 1662 आले आहे बिनविरोध निवडूनकोरोनाच सावट असताना देखील 80 टक्के मतदानमतमोजणी साठी 740 कर्मचारी असणार तैनात, 1985 ईव्हीएम मशिन्स
 
वर्धा जिल्ह्यात मतमोजणीला सुरुवात
 
वर्धा जिल्ह्यात 50 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी सकाळी दहा वाजता सुरू होत आहे
460 जागांकरिता 1301 उमेदवार रिंगणात होते
22 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली
तहसील कार्यालयात ही मतमोजणी
समुद्रपूर येथे सर्वाधिक 6 टेबल असणार
मतमोजणीच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहेय
 
 
 
हिंगोली जिल्ह्यातील मतमोजणीला प्रारंभ; पहिली फेरी सुरू, मतमोजणी परिसरात चोख पोलीस बंदोबस्त
 
 
जळगाव जिल्ह्यात 687 ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सुरुवात
प्रत्येक तहसील कार्यालयाच्या अखत्यारीत उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडतेय मतमोजणीची प्रक्रिया
5 हजार 154 जागांसाठी होईल मतमोजणी यवतमाळ जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवातelectionयवतमाळ ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात
 
जिल्ह्यात 980 ग्रामपंचायती पैकी 53 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या925 ग्रामपंचायतिची निवडणूक प्रत्यक्षात निवडणूक निकाल आज लागणार8 हजार जागासाठी 17 हजार उमेदवार रिंगणातप्रत्येक तहसील कार्यालयात मतमोजणी
अकोला जिल्ह्यातील 214 ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीला सुरुवात
 
 
 
अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचातीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवातमतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
गोंदिया जिल्ह्यात 10 वाजता मतमोजणीला होणार सुरुवात
 
 
गोंदिया जिल्ह्यातील 181 ग्रामपंचायतीच्या 1382 जागांसाठी मतमोजणी सुरू
गोंदिया जिल्ह्यात 3151 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे
सर्वात आधी पोस्ट बेलेट ला सर्वात झाली आहे.
 
ग्रामपंचायत मतमोजणीला सुरुवात ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्साह मतमोजणी केंद्राबाहेर प्रचंड गर्दी
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सुरुवात झालीसकाळी दहा वाजेपर्यंत तीन फेऱ्या पूर्णमतमोजणी केंद्राबाहेर ग्रामस्थांची प्रचंड गर्दी आहे
 
ठाणे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकाल जाहीर होण्यास सुरुवात; सेना भाजपमध्येच टक्कर10:01 January 18नाशिक - जिल्ह्यातील 556 ग्रामपंचायतीचे आज निकाल
 
11 हजार 56 उमेदवारांचा आज फैसला10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवातप्रत्यक्ष मतदानापूर्वी 55 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोधकोरोनाच सावट असताना देखील 80 टक्के मतदानमतमोजणी साठी 740 कर्मचारी असणार तैनात
नांदेडमध्ये मतमोजणीला सुरुवात
 
 
सातारा-कराड तालुक्यातील शेनोली शेरे या गावात भाजपच्या अतुल भोसले यांच्या गटाचा एकतर्फी विजयमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला धक्का...
 
 
 
 
सोलापूर जिल्ह्यातील 590 ग्रामपंचायत निवडणुकामाढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा, करमाळा, बार्शी या तालुक्यांमध्ये चुरशीची निवडणूकमतमोजणीला उत्साही प्रतिसाद मिळत आहे सकाळी नऊ वाजेपर्यंत विविध ग्रामपंचायत विजयीपाचवी फेरी चालू करण्यात आली आहे
 
 
अमरावती जिल्ह्यात मतमोजणीला सुरुवात
 
दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर होणार..अमरावती जिल्ह्यात 537 ग्रामपंचायतीसाठी व 4 हजार 397 सदस्य पदासाठी झाली होती निवडणूक..जिल्हात 75.05 टक्के झाले होते मतदान..477 सदस्य यापूर्वीच बिनविरोध तर 13 ग्रामपंचायतीही बिनविरोध ...महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मोझरी गावातील निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष...
 
 
 
माढा - केडगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्या संजयमामा शिंदेंचं वर्चस्व
 
सोलापूरमधील केडगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्या संजयमामा शिंदेंचं वर्चस्व, 9 पैकी 7 जागांवर विजय
हिवरेबाजार ग्रामपंचायतीवर पोपट पवारांची सत्ता कायम
हिवरेबाजार- आतापर्यंत सात पैकी पाच जागा जिंकून पोपटराव पवार यांचा यांच्या ग्राम विकास पॅनलची विजयी आघाडी, दोन जागांचे निकाल बाकी..
साताऱ्यात मतमोजणीला सुरुवात
 
निगडी गावात बाळासाहेब पाटलांच्या पॅनलचा विजयकराड खुबी ग्रामपंचायतीवर भाजपाचे अतुल भोसले यांचे पॅनेल
 
विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाचा अनेक ग्रामपंचायतींवर झेंडा
 
पन्हाळा तालुक्यात आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाचा अनेक ग्रामपंचायतींवर झेंडापन्हाळा शाहूवाडी मतदारसंघात विनय कोरे यांना मानणारा मोठा गटअद्याप काही ग्रामपंचायतीचे निकाल येणे बाकी
सांगली जिल्ह्यातील 142 ग्रामपंचायत निवडणुकीची सकाळी १० वाजता मतमोजणी
 
सांगली जिल्ह्यातील 142 ग्रामपंचायतीच्या अत्यंत चुरशीने निवडणूका पार पडल्या आज मतमोजणी पार पडत आहे.दुरंगी -तिरंगी अशी लढत या निवडणुकीत झाली80 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली होती.1 हजार 508 जागांसाठी तब्बल 3 हजार 76 उमेदवार निवडणुकीच्या मैदानातअनेकांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला,मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी..
मतमोजणीवेळी 5 ते 7 फेऱ्या होणार, 667 कर्माचारी नियुक्त
 
एकनाथ खडसे यांच्या कोथळी ग्रामपंचायतीच्या निकालाची उत्सुकता शिगेला
 
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायतीच्या निकालाकडे राज्याचे लक्षभाजपातून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे हे मुळगावएकनाथ खडसे व भाजप खासदार रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाची कसोटीआजपर्यंत खडसेंच्या प्रभावामुळे कोथळी ग्रामपंचायतीवर भाजपची एकहाती सत्ताभाजप खासदार रक्षा खडसेंच्या नेतृत्वाचा विचार केला तर त्यांच्यासाठीही कोथळीचा निकाल महत्त्वपूर्ण असेल.स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांच्या दृष्टीनेदेखील कोथळीचा निकाल प्रतिष्ठेचा
 
 
कोकणात 447 ग्रामपंचायती निवडणुकीचा निकाल आज
 
3127 जागांसाठी 7042 उमेदवारांचे आज भवितव्य ठरणारकोकणात 133 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत
हिवरे बाजारमध्ये मतमोजणीला सुरुवात; ३० वर्षानंतर पार पडली निवडणूक
 
 
आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेली हिवरेबाजार ग्रामपंचायत३० वर्षानंतर या ग्रामपंचायतीला निवडणुकीला सामोरे जावे लागलेपोपट पवार यांनी नाईलाने उभा केला पॅनलकोण मारणार बाजी उत्सुकता शिगेला
अहमदनगर, जालना जिल्ह्यात सकाळी ९ वाजताच मतमोजणीला सुरुवात
 
 
रायगड जिल्ह्यात 78 ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज
 
 
रायगड जिल्ह्यात 78 ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आजतहसीलदार कार्यालयात सकाळी 11 वाजता होणार मतमोजणी सुरूविजयी मिरवणूक काढण्यास जिल्ह्यात बंदी
 
 
जळगाव - ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मोठ्या उत्साहात मतदारांनी मतदान केल्यानंतर, आज (सोमवारी) मतमोजणी प्रक्रिया होऊन निकाल समोर येणार आहेत. निकालाबाबत सर्वच ग्रामपंचायतीत कमालीची उत्सुकता13 हजार 847 उमेदवारांच्या भवितव्याचा आज फैसलाजळगाव जिल्हा प्रशासनाने मतमोजणीची तयारी केली पूर्णसकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल.दुपारी 2 वाजेपर्यंत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईल, असा अंदाज आहे. कोल्हापूर जिल्ह्यात निकालाच्या आधीच उमेदवारांना अभिनंदनाचे मॅसेज
 
आज कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर होणार आहेत. १५ तारखेला मतमोजणी पार पडल्यानंतर आज मतमोजणीला सकाळी १० वाजता सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान मतदानाचे निकाल येण्यापूर्वीच उमेदवारांना अभिनंदनाचे फलक झळकू लागले आहेत.
पन्हाळा तालुक्यातील वाघवे गावात सुद्धा निवडणूक निकालाच्या आधीच अभिनंदनाचे फलक लावण्याची तयारी सुरुजिल्ह्यात अनेक ठिकाणी असे चित्र 18१२ हजार ७११ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात
 
 
 
मुंबई - राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज (१८ जानेवारी) जाहीर होणार आहे. गावा-गावात या निकालांची उत्सुकता शिगेला पोहचली असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- 26,718 अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880 होते. दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे निकाल २२ तारखेला स्पष्ट होणार आहेत.


@@AUTHORINFO_V1@@