थोरातांनंतर शिवसेनेवर आव्हाडांचीही टीका ! म्हणाले कल्याण...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2021
Total Views |

Shivsena _1  H
 
 
 


गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेवर ओढले आसूड

कल्याण : कल्याण डोंबिवलीमध्ये रस्त्यांची जी दुर्दशा झाली आहे. महाराष्ट्रात असे रस्ते कुठेही नसतील, अशी टीका महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये चांगले रस्ते दाखवा, अशी स्पर्धा भरवली जाऊ शकते, असा टोला त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला लगावला आहे.
 
 
 
शिवसेनेच्या आमदारासमोरच आव्हाडांनी हे विधान केले आहे. विशेष म्हणजे कल्याण-डोंबिवली हे शहर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सासुरवाडी आहे, तसेच या पालिकेत गेली कित्येक वर्ष शिवसेना सत्तेत आहे तरीही रस्ते दुर्दशा पीढ्यान पीढ्या कायम आहे. "कल्याण डोंबिवली महापालिकेत गेल्या वीस वर्षापासून शिवसेना-भाजपाची सत्ता होती. मध्यांतरीच अडीच वर्षाचा काळ सोडला तर शिवसेना भाजपाची सत्ता होती. राज्यातील युती तुटल्यावर कल्याण डोंबिवलीत शिवसेनेच्या हाती सत्तेच्या चाव्या आल्या. सध्या महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे.
 
 
निवडणूका जवळ येत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविली जाणार आहे हे जाहीर केले होते. मात्र, आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणो शिवसेनेवर टिका केली आहे. येत्या महापालिका निवडणूकीत रस्त्यांचा मुद्दा चांगलाच गाजणार आहे.
कल्याणमध्ये राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यातर्फे क्रिकेट स्पर्धेसाठी आव्हाड हे कल्याणमध्ये आले होते. आव्हाड यांनी उपरोक्त टीका यावेळी केली. शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर, आमदार राजू पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आव्हाड म्हणाले, "कल्याणमध्ये रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. येथे तरुण वर्ग जास्त आहे. काहीतरी बदल केला पाहिजे. चांगले रस्ते दाखविण्यासाठी एक स्पर्धा ठेवली पाहिजे अशी टीका केली आहे.
 
 
 
 
राजू पाटील यांनी केले स्वागत!
 
"आव्हांडाच्या या टिकेनंतर कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकीत याचे पडसाद उमटणार आहेत. मनसे आमदार राजू पाटील यांनी आव्हाडांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. ठाण्यातील एका तरी नेत्याला व्यथा समजली. याचे मी स्वागत करतो. निवडणूका जवळ आल्याने त्यांनी हे वक्तव्य केले असले तरी सत्यकथन केले आहे, असे ते म्हणाले.


@@AUTHORINFO_V1@@