कल्याणमध्ये रस्त्यांची दुर्दशा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2021
Total Views |
कल्याणमध्ये रस्त्यांची दुर्दशा
जितेंद्र आव्हाड यांची शिवसेनेवर टिका

jitendra awadha photo_1&n 
 
 
 
 
कल्याण : कल्याणमध्ये रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. महाराष्ट्रात असे रस्ते कोठे नसतील. चांगले रस्ते दाखवा अशी स्पर्धा ठेवली पाहिजे असे वक्तत्व करीत राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधारी आणि मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला उपरोधिक टोला दिला आहे. विशेष म्हणजे कडोंमपामध्ये शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेच्या आमदारासमोरच हे विधान आव्हाडांनी केले आहे.
 
 
कल्याण डोंबिवली महापालिकेत गेल्या वीस वर्षापासून शिवसेना भाजपाची सत्ता होती. मध्यांतरीच अडीच वर्षाचा काळ सोडला तर शिवसेना भाजपाची सत्ता होती. राज्यातील युती तुटल्यावर कडोंमपात ही युती तुटली. सत्ता शिवसेनेच्या हाती आली. सध्या महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. निवडणूका जवळ येत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविली जाणार आहे हे जाहीर केले होते. मात्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणो शिवसेनेवर टिका केली आहे. येत्या महा निवडणूकीत रस्त्याचा विषय चांगलाच गाजणार असल्याचे दिसून येत आहे. कल्याणमध्ये राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यातर्फे क्रि केट स्पर्धेसाठी आव्हाड हे कल्याणमध्ये आले होते. आव्हाड यांनी उपरोक्त टिका यावेळी केली. शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर, आमदार राजू पाटील उपस्थित होते.
 
 
आव्हाड म्हणाले, कल्याणमध्ये रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. येथे तरु ण वर्ग जास्त आहे. काही तरी बदल केला पाहिजे. चांगले रस्ते दाखविण्यासाठी एक स्पर्धा ठेवली पाहिजे अशी टीका केली आहे.
आव्हांडाच्या या टिकेनंतर कडोंमपाच्या निवडणूकीत याचे पडसाद उमटणार हे पाहावे लागेल. मात्र राष्ट्रवादी शिवसेनेत धूसफूस सुरू झाली आहे. आव्हाडांच्या या टिकेवर आमदार राजू पाटील म्हणाले की, ठाण्यातील एका तरी नेत्याला व्यथा समजली. याचे मी स्वागत करतो. निवडणूका जवळ आल्याने त्यांनी हे वक्तव्य केले असले तरी सत्य कथन केले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@