‘ड्रोनस्वार्मिंग’ : भारतीय लष्कराची नवी ताकद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2021
Total Views |

Indian Army  _1 &nbs
 
नवी दिल्ली : भारतीय लष्कराने सैन्य दिन संचलनादरम्यान १५ जानेवारी रोजी दिल्ली छावणी परिसरात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरून ७५ देशी बनावटीच्या ‘ड्रोन’चा वापर करून ड्रोन सामूहिक कृती क्षमतेचे थेट प्रात्यक्षिक दाखवले.भविष्यातील सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञानाद्वारे सक्षम असलेल्या दलात स्वतःला रूपांतरित करण्यासाठी भारतीय लष्कर सातत्याने उदयोन्मुख आणि विनाशकारी तंत्रज्ञान आत्मसात करत असल्याचे यातून दिसून येते. या तंत्रज्ञानासाठी भारतीय लष्कराकडून कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वायत्त शस्त्रे प्रणाली, क्वांटम टेक्नोलॉजी, रोबोटिक्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि अल्गोरिदम वॉरफेअर यामध्ये मोठी गुंतवणूक केली जात आहे.
 
भारतीय लष्कराने भविष्याची स्वप्ने बघणारे, ‘स्टार्ट अप’, सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग, खासगी क्षेत्र, शैक्षणिक संस्था, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (डीपीएसयू) यांच्या समन्वयाने तंत्रज्ञानाचे विस्तृत उपक्रम हाती घेतले आहेत. असाच एक प्रकल्प म्हणजे ‘आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) ऑपरेशनल ड्रोन ऑपरेशन्स’ जो भारतीय ‘स्टार्ट अप’ने विकसित केला आहे. हा प्रकल्प म्हणजे देशाला शस्त्रास्त्रांच्या मंचावर स्वायत्तता देण्याबरोबरच भारतीय सैन्याच्या, मनुष्यबळाला आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देण्याच्या वचनबद्धतेचे दर्शन घडवतो.
  
 
‘ड्रोनस्वार्मिंग’ म्हणजे काय?
‘ड्रोनस्वार्मिंग’ ही अत्यंत अत्याधुनिक युद्धपद्धती आहे. यामध्ये एकाच वेळी मोठ्या संख्येने ‘ड्रोन’ लॉन्च केले जातात. प्रत्येक ‘ड्रोन’चे लक्ष्य वेगवेगळे असते. मोठ्या संख्येने ‘ड्रोन’ लॉन्च केल्यानंतर त्यांना थांबविणे हे जवळपास अशक्य असते. याद्वारे शत्रूचा एअर डिफेन्स, रडार स्टेशन, विमानतळ अशी महत्त्वाची ठिकाणे उद्ध्वस्त करता येतात. त्याचप्रमाणे सैनिकांना आवश्यक ते साहित्यही पोहोचविता येते.



@@AUTHORINFO_V1@@